7th Pay Commission: लाखो कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार कडून दिले जाणार नव वर्षाचं गिफ्ट, 10 हजार रुपयापर्यंत वेतन वाढण्याची शक्यता
Cash | (Archived, edited, representative images) (Photo Credits : IANS)

सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. दरम्यान 2019 जुलै ते सप्टेंबर मध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी मिळणाऱअया डीएमध्ये वर्षात दोन वेळा वाढ केली जाते. मात्र सरकारकडून डीए किती दिला जाणार आणि कोणत्या आधारावर दिला जाणार हे अस्पष्ट आहे. परंतु नव वर्षात सरकार कर्मचाऱ्यांना गिफ्ट देऊ शकते. त्यानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन 10 हजार रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

सरकारकडून जुलै ते अक्टोबर 2019 दरम्यानची महागाई भत्त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2019 मध्य हा आकडा 324 राहिला होता. म्हणजेच सप्टेंबर महिन्यात 3 अंकांनी वाढ झाली आहे. या आकेडवारीकडे नीट लक्ष दिल्यास कमीत कमी 4 टक्क्यांनी वाढ केल्याचे दिसून येईल.कर्मचारी गेल्या काही काळापासून कमीत कमी वेतन आणि फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी करत आहेत. कर्मचाऱ्यांची अशी मागणी आहे की, 18 हजार रुपये वाढवून 25 हजार रुपये करण्यात यावे. त्याचसोबत फिटमेंट फॅक्टर 2.57 वरुन 3.68 टक्के केला पाहिजे. दरम्यान देशाची सध्या आर्थिक स्थिती पाहता सरकार काय निर्णय घेणार हे येणारा काळच स्पष्ट सांगणार आहे.(7th Pay Commission News: सातव्या वेतन आयोगामुळे भारतीय रेल्वेतील Non- Gazetted Medical कर्मचाऱ्यांना होऊ शकतो 21,000 पर्यंतचा मोठा फायदा; पहा कसा?)

तर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार Rationalisation Of Gratuity ही पद्धती केंद्र सरकारने आता स्वीकारली आहे. त्यामुळे जर सरकारी कर्मचार्‍याच सेवेत असताना वर्षभराच्या आतमध्येच अकाली निधन झाल्यास तर दरमहा मिळणार्‍या भत्ताच्या दुप्पट Death gratuity दिली जाते. तर 1 वर्षापेक्षा जास्त आणि पाच वर्षाच्या कार्यकाळात त्याचं निधन झाल्यास हेच गुणोत्तर सहा पट असतं. सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार, आता ग्रॅज्युटीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम 1 जानेवारी 2016 म्हणजे जेव्हा पासून केंद्रीय कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे तेव्हापासून 10 लाखाहून 20 लाख करण्यात आला आहे. दरम्यान आता हा माहगाई भत्ता 50% वाढल्यानंतर ग्रॅज्युटीमध्येदेखील 25% वाढ होण्याची शक्यता आहे.