7th Pay Commission | (Photo courtesy: archived, edited, Symbolic images)

7th Pay Commission: सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी अनेक तरतुदींच्या घोषणा केल्या जात आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सुद्धा अशीच एक आनंदाची बातमी समोर येणार असल्याचा अंदाज आहे. माध्यमाच्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत 50  लाख कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात (Basic Salary) वाढ करून एक खुशखबर दिली जाऊ शकते. भारतीय रेल्वेच्या (Indian Railway)  नॉन गॅजेटेड मेडिकल (Non-Gazetted Medical Employee) कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून 5000 वरून बेसिक पगार हा थेट 21,000 केला जाण्याची शक्यता आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या (Cabinet Ministers)  बैठकीत सुरुवातीला याबाबत चर्चा करून त्यावर अर्थमंत्रालयाच्या (Ministry Of Finance) संमतीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते.7th Pay Commission: वेतन आयोग बाबत तुम्हांला या गोष्टी ठाऊक आहेत का?

प्राप्त माहितीनुसार, भारतीय रेल्वेच्या नॉन गॅजेटेड मेडिकल स्टाफ ला बेसिक सॅलरी शिवाय अनेक उच्च पदावरील मंडळींना प्रमोशनचा लाभ मिळू शकतो. ऑल इंडिया रेल्वे माइंस फेडरेशनचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेत हि शक्यता वर्तवली आहे. "अनेक कर्मचारी अनेक वर्षांपासून प्रमोशनची मागणी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी बातमी असू शकते" असेही मिश्रा यांनी सांगितले. पगारवाढीचा निर्णय घेतल्यास यात रेडियोग्राफर, हेल्थ एंड मलेरिया इंस्पेक्टर, लॅब स्टाफ, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, डाइटिशियन, फिजियोथेरेपिस्ट आणि फॅमिली वेलफेयर ऑर्गनाइझेशन या अंतर्गत कर्मचाऱ्यांना नक्कीच लाभ होणार आहे. 7th Pay Commission: 2020 पूर्वीच भारतीय रेल्वेच्या 'या' ऑफिसर्सना मिळू शकते गुड न्यूज; पगारात होणार वाढ

दरम्यान, सद्य घडीस या कर्मचाऱ्यांचा किमान पगार हा 5000 इतका आहे ज्यात बाध करून 21,000 होण्याची मागणी आहे. ही किमंत सध्याच्या पगाराच्या चौपटीत असल्याने यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव येऊ शकते त्यामुळे यात सुवर्णमध्य काढण्याच्या प्रयत्नांना सरकार आहे.