भारतीय रेल्वे (Photo Credits: Twitter/@RailMinIndia)

7th Pay Commission News:  2020 म्हणजे आगामी नव्या वर्षामध्ये भारतीय रेल्वेच्या कर्मचार्‍यांना (Indian Railways) सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे. दरम्यान भारतीय रेल्वेमध्ये काम करणार्‍या नॉन गॅजेटेड मेडिकल स्टाफला प्रमोशन म्हणून पगारात भरघोस वाढ मिळणार आहे. सध्या हा पगारवाढीचा प्रस्ताव रेल्वेकडून मंजूर झाल्यानंतर सरकारकडे अंतिम निर्णयासाठी पाठवला जाणार आहे. 7th Pay Commission: मोदी सरकारच्या आगामी कॅबिनेट मिटींगमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता; पगारात होणार घसघशीत वाढ?

ऑल इंडिया रेल्वे माईन्स फेडरेशनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. नॉन गॅजेटेड मेडिकल स्टाफच्या मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रमोशनला हिरवा कंदील मिळाला आहे. त्याच्या अंतर्गत आता भारतीय रेल्वेमध्ये आठ श्रेणींमध्ये प्रमोशन दिलं जाऊ शकतं. त्याच्या परिणाम कर्मचार्‍यांच्या वेतनावर होणार आहे. रेल्वे कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये दरमहा 21 हजार रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.  7th Pay Commission: वेतन आयोग बाबत तुम्हांला या गोष्टी ठाऊक आहेत का?

रेल्वे कर्मचार्‍यांच्या पगारात होणारी वाढ ही स्वीकरालेल्या फॉर्म्युला नुसार होणार आहे. हा सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसआर ठरवण्यात आला आहे. यामध्ये कर्मचार्‍यांना दरमहा HRA म्हणजेच घरभाडं, DA म्हणजे महागाई भत्ता तसेच प्रवासाचा भत्ता म्हणजे TA यांच्यामध्येही नियमानुसआर वाढवले जाणार आहे.

केंद्र सरकारने केलेल्या दाव्यानुसार मागील 5 वर्षांमध्ये सार्‍या श्रेणींमधील कर्मचार्‍यांच्या किमान वेतनामध्ये 42% वाढ झाली आहे. ही माहिती यंदा फेब्रुवारी महिन्यात झालेल्या तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी अंतरिम बजेट 2019-20 सादर करताना म्हटले आहे.