Coronavirus Tests In India: देशात आजवर 1 कोटीहुन अधिक कोरोना व्हायरस चाचण्या; मागील 24 तासात 2,41,430 टेस्ट पडल्या पार
Coronavirus Testing (Photo Credits: PTI)

Coronavirus Tests Update: भारतात कोरोना व्हायरसच्या चाचण्यांचा वेग वाढवून विषाणू पसरण्याच्या आधीच ओळखण्याची रणनीती वापरण्यात येत आहे. देशात आजवर झालेल्या कोरोना चाचण्यांनी 1 कोटींचा टप्पा पार केला आहे. प्राप्त माहितीनुसार, सोमवार 6  जुलै पर्यंत देशात एकूण 1,02,11,092 कोरोना टेस्ट घेण्यात आल्या. यापैकी 2,41,430 चाचण्या या तर मागील अवघ्या 24तासात घेतलेल्या आहेत. देशात कोरोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणी अधिकाधिक चाचण्या करण्यासाठी विशेष केंद्र उभारण्यात आली आहेत, तर मुंबई, दिल्ली या मुख्य हॉटस्पॉट मध्ये घरोघरी जाऊन सुद्धा लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. कोरोनाचे लेटेस्ट अपडेट जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

दुसरीकडे, भारतात कोरोना रुग्णांचा आकडा आता 7  लाखांच्या पार गेला आहे. मागील 24 तासांत देशात 22,252 नवे रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7 लाख 19 हजार 665 इतकी आहे. यात सद्य घडीला देशात 2,59,557 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मृतांची एकूण संख्या 20,160 वर पोहोचली आहे तर 4,39,948 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

ANI ट्विट

Worldometer च्या आकडेवारीनुसार, सध्या कोरोनाचा फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारताने रशियाला मागे ताकात 3 रे स्थान मिळवले आहे. सध्या जगात सर्वाधिक कोरोना संसर्गाची प्रकरणे अमेरिकेत (US) आहेत. जगातील महासत्ता असलेल्या या देशात 29 लाखाहून अधिक प्रकरणे आहेत. अमेरिकानंतर ब्राझील (Brazil), भारत आणि रशिया मध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित आहेत.