जेएनयूच्या जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीला अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने भेट देत त्यांची तिने  विचारपूस केली.

गेटवे ऑफ इंडिया येथे  'Freee Kashmir' चे पोस्टर झळकवणाऱ्या मेहेक नाव असलेल्या तरुणीच्या विरोधात FIR दाखल करण्यात आले आहे.

मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे राज ठाकरे यांच्यामध्ये गुप्त भेट झाली. या दोघांमधील भेटीत जवळजवळ एकतास बातचीत झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

काका पवार तालीम (Kaka Pawar Talim) पुणे येथील पठ्ठा हर्षवर्धन सदगीर  हा मल्ल यंदाचा 'महाराष्ट्र केसरी' ठरला आहे. हर्षवर्धन सदगीर याने  काका पवार या आपल्याच तालमीचा मल्ल शैलेश शेळके याला अंतिम कुस्ती सामन्यात आस्मान दाखवत 'महाराष्ट्र केसरी' गदा मिळवली आहे. 

महाराष्ट्र केसरी 2020 च्या हर्षवर्धन सदगीर  विरुद्ध शैलेश शेळके यांच्यामध्ये अंतिम लढतीला सुरुवात झाली आहे.  त्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता अधिक वाढली असून कोण विजयी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

महाराष्ट्र केसरी 2020 अंतिम सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. आजच्या अंतिम सामन्यात हर्षवर्धन सदगीर विरुद्ध शैलेश शेळके यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली उपस्थिती लावली आहे. येथे पहा सामन्याचा लाईव्ह स्ट्रिमिंग

निर्भया प्रकरणी  दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आरोपींचे वकील  एपी सिंग हे सुप्रीम कोर्टात धाव घेणार असून पुढील एक-दोन दिवसात याचिका दाखल करणार आहेत. याचिकेवर सुप्रीम कोर्ट पुर्नविचार करेल अशी अपेक्षा एपी सिंग यांनी व्यक्त केली आहे.

निर्भया गॅंग रेप प्रकरणी पटियाला हायकोर्टाने दिलेल्या निकालानुसार डेथ वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आरोपींना 22 जानेवारी दिवशी सकाळी 7 वाजता फाशी देण्यात येणार आहे. 

मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झाल्यानंतर महाविकासआघाडी सरकारचे खातेवाटप नुकतेच पार पडले. हे खातेवाटप झाल्यानंतर महाविकासआघाडी सरकारची ही पहिलीच मंत्रीमंडळ बैठक होती. नेहमीप्रमाणे या बैठकीस आसनव्यवस्था करण्यात आली होती. मंत्रिमंडळ बैठकीवेळी अशोक चव्हाण हे भुजबळ यांच्या खुर्चीत बसले. यावरुन भुजबळ संतापले आणि या दोन मंत्र्यामंध्ये वादावादी झाली. 

2004 मध्ये आम्ही आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला होता. आम्ही विनयभंगाच्या ओरपाबाबत बोलू असे अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने म्हटले आहे. तनुश्री दत्ता ही पत्रकार परिषदेत बोलत होती.

Load More

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या संकुलामध्ये रविवार (5 जानेवारी) च्या रात्री विद्यार्थ्यांवर बुरखाधार्‍यांनी केलेली मारहाण आणि नासधुसीचा आता देशभरातून निषेध केला जात आहे. दरम्यान मुंबईमध्येही या हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलनं सुरू आहे. आज (7 जानेवारी) सकाळी गेटवे ऑफ इंडिया परिसरात सुरू असलेलं हे आंदोलन आता आझाद मैदान परिसरात सुरू केले जाणार आहे. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांची गेटवे परिसरातुन उचलबांगडी केली आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या 

दरम्यान जेएनयू मध्ये मागील काही दिवसांपासून वसतिगृह शुल्कवाढीवरून सुरु असणाऱ्या वादातूनच हा हल्ला झाला असल्याचे म्हटले जात असले तरीही याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तूर्तास या शुल्कवाढीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांकडून सेमिस्टर परीक्षेच्या नोंदणीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे ज्यामुळे वाद आणखीन चिघळला गेला असे म्हंटले जातेय.

जेएनयू मध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध राजकारणी, खेळाडू ते बॉलिवूड विश्वातील कलाकारांनीदेखील केला आहे. दरम्यान काल कलाकारांनी रस्त्यावर उतरून या हल्ल्याचा निषेध केला आहे.