Maharashtra Kesari Final 2020 Live Streaming: कुस्तीवीर हर्षवर्धन सदगीर विरूद्ध शैलेश शेळके मध्ये रंगणार 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' चा अंतिम सामना; इथे पहा लढतीचे लाईव्ह स्ट्रिमिंग
Maharashtra Kesari | Photo Credits: Facebook

Maharashtra Kesari Kusti 2020 Final Live Streaming :   महाराष्ट्र केसरी 2020 मध्ये आज अंतिम लढत गादी विभागाच्या हर्षवर्धन सदगीर (Harshavardhan Sadgir) विरूद्ध माती विभागाच्या शैलेश शेळके (Shailesh Shelke) यांच्यामध्ये होणार आहे. पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये रंगणारा अंतिम सामना तुम्हांला ऑनलाईन पाहणं शक्य नसेल तर अशा कुस्ती रसिकांसाठी ऑनलाईन माध्यमातून हा सामना पाहण्याची सोय युट्युब चॅनलवर खास सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आज (7 जानेवारी) संध्याकाळी पुण्यात रंगणार्‍या या सामन्याचा क्षणाक्षणाचा थरार तुम्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या युट्युब चॅनलवर पाहू शकता.

63 व्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत एकमेकांविरूद्ध लढणारे हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके हे दोघेही काका पवार तालीमीमधील पठ्ठे आहेत. दरम्यान पुण्यात काल रंगलेल्या अटीतटीच्या उपांत्य फेरीमध्ये गतवर्षीचा विजेता बाला रफिक आणि अभिजित कटके दोघेही स्पर्धेबाहेर पडल्याने नवा ट्विट आला आहे. या खेळामध्ये आज रंगणार्‍या अंतिम फेरीमध्ये चांदीची गदा नव्या कुस्तीवीराच्या हातामध्ये जाणार आहे. आता तो पैहलवान कोण असेल? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (Maharashtra Kesari Kusti 2018: बाला रफिक शेख, महाराष्ट्र केसरी कुस्ती 2018 विजेते, पहा 1961-2018 पर्यंत कोण कोण आहेत विजेते).

दरम्यान मागील वर्षी बुलढाण्याचा बाला रफीक हा महाराष्ट्र केसरी ठरला होता. गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते.महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा आणि 2 लाख रुपयाचं रोख बक्षीस दिले जात असल्याने ही स्पर्धा अत्यंत चर्चेची ठरते.