अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे 10 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

United States #Coronavirus deaths top 10,000: AFP news agency quoting Johns Hopkins tracker— ANI (@ANI) April 6, 2020

ब्रिटनेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन तुम्ही लवकरच रुग्णालयातून तंदुरुस्त बरे होऊन येणार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा व्यक्त केली आहे.

तेलंगणा येथे कोरोना व्हायरसचे आणखी 30 रुग्ण आढळल्याने आकडा 308 वर पोहचला असून 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

फ्रान्स येथे कोरोनामुळे आणखी 833 जणांचा मृत्यू झाल्याने आकडा 8911 वर पोहचल्याची माहिती AFP न्यूज यांनी दिली आहे. 

लॉकडाउनच्या काळात अवैध मद्य विक्री केल्याने राज्य उत्पादन शुक्ल विभागाने 13 दिवसात 1429 गुन्हांची नोंद तर 541 आरोपींना अटक करण्यात आले आहे. तसेच 43 लाख रुपयांचा मुद्देमाल ही जप्त केल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. 

नागपूर येथे कोरोना व्हायरसमुळे 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

दिल्ली येथे 525 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यामधील 329 जण हे तबलीगी जमातीचे आहेत.  तर कोरोना व्हायरसमुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

न्यूयॉर्क येथे कोरोना व्हायरसमुळे आणखी 599  जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील पुणे येथे कोरोना व्हायरसचे नवे 37 रुग्ण आढळून आल्याने आकडा 141 वर पोहचला आहे.

कोरोना व्हायरसमुळे 38 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती वसई-विरार महापालिकेने दिली आहे. 

Load More

कोरोना व्हायरस (Coranavirus) संकटामुळे राज्यासह देशभरात असलेली लॉकडाऊन (Lockdown) स्थिती. त्याचा आर्थिक, सामाजिक आणि त्यानंतर होणारा सांस्कृतीक परिणाम. दररोजची वाढणारी कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नरत असलेली महाराष्ट्र (Maharashtra), भारतासह जगभरातील आरोग्य यंत्रणा. ही यंत्रणा अधिक सक्षमपणे काम करावी यासाठी त्यांना अर्थपुरवठा करणारी जगभरातील राष्ट्रं आणि या सर्वांत घरातील दिवे बंद करुन देवे लाऊन उजेड पाडण्यासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल स्वागत. त्याला मिळालेला देशभरातील जनतेचा उत्साही आणि अतिउत्साही पाठिंबा... अशा काही प्रमुख मुद्द्यांवर उमटणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया आज दिवसभरातील ठळक घटना, घडामोडींचे आकर्षण असणार आहे.

कोरोना व्हायरस संकटाशी केवळ भारतच नव्हे तर, जगभरातील अनेक देश सामना करत आहेत. खरेतर ते देश भारताच्या कितीतरी पटींनी गर्तेत आहेत. यात भारताचा शेजारी पाकिस्तानही आहे. दरम्यान, काश्मीर येथे पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आले. यात तीन जवानही शहीद झाले. आता हे घुसखोर दहशतवादी नेमके कोठून येत असतात हे जगाला माहिती आहे. कोरोनाशी सामना करता करता भारताच्या शेजाऱ्यांकडून सीमेवर काय उद्योग सरु आहेत, याबाबतही घडणाऱ्या घडामोडींकडे आज दिवसभरात लक्ष राहणार आहे.

दरम्यान, कोरना व्हायरस बाधित रुग्णांची देशभरातील संख्या, त्यात होणारी वाढ, घट. केंद्रीय आणि राज्य आरोग्य मंत्रालय आदींकडून त्याबाबत दिले जाणारे अद्ययावत तपशील, माहिती हे सर्व लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले जाणार आहे. त्यामुळे ताज्या घटना, घडामोडी आणि त्यांबाबतच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगशी जोडलेले राहा.