BJP Leader Manju Tiwari Firing In Air (Photo Credits; Twitter)

कोरोना (Coronavirus) विरुद्ध लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना आपल्या एकीचे प्रदर्शन करण्यासाठी काल 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घराबाहेर दीप प्रज्वलन करण्याचे आवाहन केले होते, मोदींच्या या आवाहनाला देशातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र याही वेळेस काही महाभागांच्या अति उत्साहामुळे या दिया जलाओ अभियानाला गालबोट लागले आहे. सामान्य नागरिकच नव्हे तर स्वतः भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडूनही अशीच एक बाब घडली आहे. बलरामपूर (Balrampur) येथे भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजू तिवारी (Manju Tiwari)  यांनी दिवे लावून झाल्यावर कोरोनाला पळवण्यासाठी आपल्या बंदुकीने हवेत गोळीबार केला आहे. इतकंच नव्हे तर हा गोळीबार करतानाच व्हिडीओ सुद्धा मंजू यांनी फेसबुकवर अपलोड केला आहे. Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या #9PM9Minutes या उपक्रमावेळी सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या नासा उपग्रहाच्या फोटोंमागील सत्य जाणून घ्या सविस्तर

ट्विटर वरील एका युजरने मंजू तिवारी यांचा हा व्हिडीओ ट्विट केला आहे, यामध्ये दिवे लावून झाल्यानंतर मंजू तिवारी यांनी कोरोनाला पऴवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचे दिसत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील बलरामपूर इथे घडली आहे. त्यांच्या या व्हिडीओला 224 लाईक्स आणि 66 कमेंट्स आल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या खाली लोकांनी मंजू यांच्या कृतीवर टीका करत त्यांच्यावर पक्ष आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

पहा ट्विट

दरम्यान, देशभरात सध्या कोरोनाचा फैलाव वाढत आहे, आज घडीला कोरोनाचे तब्बल 4000 हुन अधिक रुग्ण भारतात आहेत तर मृतांचा आकडा सुद्धा 100 च्या पार गेला आहे. या संकटाला रोखण्यासाठी देशात 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे या एकूण परिस्थितीत देशातील नागरिकांच्या मनात निर्माण झालेले नैराश्य दूर करण्यासाठी मोदींनी दिया जलाओ हा उपक्रम राबवला होता. याला देशातील सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी, उद्योगपती अशा सर्वांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.