5-yr-old Travels Alone in Flight From Delhi to Bengaluru (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसमुळे ठप्प झालेली देशांर्गत विमान प्रवास सेवा आजपासून पुन्हा पूर्ववत होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान काही नियमावलीच्या आधारे भारतामध्ये मर्यादित स्वरूपात विमानसेवा सुरू झाली आहे. अशामध्ये आज पहिल्याच दिवशी 5 वर्षीय विहान शर्मा (Vihaan Sharma) या चिमुकल्याने एकट्याने विमानप्रवास करून दिल्लीवरून बंगळूरू शहर गाठले आहे. दरम्यान आज (25 मे) 3 महिन्यांनंतर विहानची त्याच्या आईसोबत भेट झाली. विहानची आई त्याला घेण्यासाठी बेंगळूरूच्या Kempegowda International Airport वर आली होती.

दरम्यान विहान मागील दोन महिन्यांपासून दिल्ली मध्ये आजी आजोबांकडे राहत होता. 24 मार्चला लॉकडाऊन जाहीर झाला. या लॉकडाऊनमध्ये देशांर्तगत विमानसेवा आणि एकूच संचारबंदी जाहीर करण्यात आली त्यामुळे विहानचा घरी परतण्याचा मार्ग बंद झाला होता. मात्र आजपासून विमानसेवा सुरू झाल्याने तो घरी परतला आहे.

ANI Tweet

आज बंगळूरूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 9 पर्यंत 5 विमानं उतरली होती. 17 हवेत झेपावली तर 9 विमानं रद्द झाली होती. दरम्यान आजपासून देशांर्गत विमानसेवा सुरू झाली असली तरीही अनेक ठिकाणी अचानक पूर्वसूचना न देता विमानं रद्द झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. काही विमानतळांवर प्रवाशांची नाराजी पाहायला मिळाली आहे. आजपासून मुंबईमध्ये सुमारे 25 विमानांच्या टेक ऑफ आणि लॅन्डिंगला परवानगी देण्यात आली आहे.