केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या प्रकृती बाबत अफवा पसरवणारे ट्विट करणाऱ्या टीम मधील संशियत चार तरुणांना अहमदाबाद (Ahemdabad) मध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल केला नसला तरी सध्या त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जाणार आहे. काल पासूनच अमित शहा यांच्या तब्येतीत बिघाड आल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला होता. यामध्ये अमित शाह यांना हाडांचा कॅन्सर असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यातही हे ट्विट अमित शहा यांच्या अकाऊंटवरून करण्यात आल्याने आणखीनच भर पडला होता. मात्र आता हे ट्विट खोटे असल्याचं स्पष्टीकरण स्वतः शहा यांनी दिले असून याप्रकरणात पोलीस सध्या तपास करत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अमित शहा यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, मी पूर्णपणे बरा असून मला कोणताही आजार नाही आहे असे स्पष्ट केले. "अशा अफवा पसरत असतात मात्र गृहमंत्री या नात्याने रात्री उशीरापर्यंत कामात व्यस्त असल्याने प्रकृती संदर्भातील या अफवेच्या गोष्टीकडे लक्ष नाही दिले. परंतु पक्षातील लाखो कार्यकर्ते आणि माझ्या शुभचिंतकांनी गेल्या दोन दिवसात यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. त्यामुळेच मी आज स्पष्टीकरण देत आहे असे अमित शहा यांनी म्हटले आहे. अमित शहा यांचे स्पष्टीकरण सविस्तर वाचा
ANI ट्विट
Gujarat: Police have detained 4 persons in Ahmedabad, in connection with a fake tweet being circulated in the name of Union Home Minister Amit Shah
— ANI (@ANI) May 9, 2020
दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून अमित शहा यांच्या प्रकृतीसंदर्भात गंभीर अफवा पसवरल्यानंतर त्यांच्या मृत्यूसाठी सुद्धा ट्वीट करुन प्रार्थना केल्याचे दिसून आले होते. यावर सुद्धा उत्तर देताना शहा यांनी लोकांनी त्यांना या व्यर्थ गोष्टी सोडून मला माझे कार्य करु द्या आणि तुम्ही सुद्धा करावे असे आवाहन केले आहे. अफवा पसरवणाऱ्यांच्या बाबत कोणताही राग नाही असेही शहा यांनी म्हंटले आहे.