CRIME (Photo Credit- X)

Haryana Murder Case: हरियाणातील कुरुक्षेत्र (Kurukshetra) येथे शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या (Murder) करण्यात आली. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये पती, पत्नी, त्यांचा मुलगा आणि सून यांचा समावेश आहे. वृद्ध दाम्पत्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आहेत. घटनेच्या वेळी सर्वजण आपापल्या खोलीत झोपले होते. सकाळी घरातील एकही सदस्य घराबाहेर न आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

शेजाऱ्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. कुटुंबातील दोन सदस्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. नायब सिंग, त्यांची पत्नी इमृत कौर, मुलगा दुष्यंत, सून अमृत कौर अशी मृतांची नावे आहेत. तर नायब सिंग यांचा नातू केशव (13) हा गंभीर जखमी आहे. (हेही वाचा -Malabar Hill Murder Case: चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या; मुंबईतील मलबार हिल परिसरातील घटना)

प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण शहााबादच्या यारा गावातील आहे. येथे कुटुंब प्रमुख नायब सिंह, त्यांची पत्नी इम्रत, मुलगा दुष्यंत, सून अमृत कौर आणि नातू केशव झोपले होते. सकाळी आठ वाजेपर्यंतही त्यांच्या घरात काहीच हालचाल न झाल्याने ग्रामस्थांनी नायबसिंग यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. बराच वेळ दरवाजा वाजवूनही आतून आवाज येत नसल्याने लोकांनी घराचा दरवाजा तोडला. आत गेल्यानंतर शेजाऱ्यांना नायब सिंग आणि त्यांची पत्नी इमृत रक्तबंबाळ अवस्थेत मृतावस्थेत पडलेले दिसले. दोघांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला होता. (हेही वाचा -Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये 26 आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावला 'मोक्का')

दरम्यान, लोकांनी घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन पाहिले असता दुष्यंत, त्याची पत्नी अमृत कौर आणि मुलगा केशव हे देखील गंभीर जखमी अवस्थेत आढळले. ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना बोलावून तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जिथे दुष्यंत आणि अमृत कौर यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. अद्याप या हत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.