एनसीपी नेता आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या 12 ऑक्टोबरला झालेल्या हत्येला आता दीड महिना उलटला आहे. यामध्ये पोलिसांनी 26 जणांना अटक केली आहे. देशभरातून वेगवेगळ्या भागातून त्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, या सार्या 26 जणांवर मोक्का (Maharashtra Control of Organised Crime Act) लावण्यात आला आहे. क्राईम ब्रांच कडून आता या प्रकरणामध्ये कथित मुख्य शूटर शिव कुमार गौतम सह 26 जण अटकेत आहेत.
MCOCA अंतर्गत पोलिसांसमोर दिलेली कबुली न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातात. महत्त्वाची बाब म्हणजे मोक्का लागल्यानंतर आता या अंतर्गत आरोपींना जामीन मिळणेही अवघड आहे. Baba Siddique Muder Case: 'पोलिसांना घाबरू नका, आपल्याकडे वकिलांची फौज आहे'; बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवेळी लॉरेन्स बिश्नोईने थेट आरोपीशी साधला होता संवाद .
बाबा सिद्दीकींच्या आरोपींवर मोक्का
Mumbai Police has invoked MCOCA (Maharashtra Control of Organised Crime Act) in the murder case of NCP leader Baba Siddique. So far 26 accused have been arrested in this case and 3 are wanted: Mumbai Police
— ANI (@ANI) November 30, 2024
जेल मध्ये असलेल्या लॉरेंस बिष्णोई चा भाऊ अनमोल सिद्दीकी सोबत बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींचा संपर्क झाल्याचं काही पुराव्यांमधून समोर आलं आहे. दरम्यान अनमोलला देखील अमेरिकेमध्ये अटक करण्यात आली आहे. 12 ऑक्टोबरला मुंबईत वांद्रे पूर्व येथील झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला. लीलावती हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी शुभम लोणकर आणि झीशान मोहम्मद अख्तर अद्याप फरार आहे.