Ujjain Gang Rape: मध्य प्रदेशातील उज्जैन (Ujjain) मधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून कारमध्ये नेले आणि वाटेत आणखी दोन तरुण कारमध्ये बसले. यावेळी अल्पवयीन मुलीवर चालत्या कारमध्ये तोंड दाबून सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर तरुणाने तरुणीला उज्जैन आग्रा रोडवरील मेडिकल कॉलेजच्या बाहेर सोडून घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे, तर अन्य दोन आरोपी सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. उज्जैनमधील चिमणगंज पोलीस स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी चिमणगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी दोन दिवस तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ती सापडली नाही. त्यांनी चिमणगंज पोलिस ठाण्यात त्याच्या हरवल्याची तक्रार नोंदवली. आपल्या बेपत्ता मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी या प्रकरणी कलम वाढवून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा - Delhi Rape Case: दिल्लीत ओडिशातील महिलेवर सामूहिक बलात्कार; अपंग व्यक्तीसह 3 जणांना अटक (See Pics))
उज्जैन क्राइमचे एसपी सुमित अग्रवाल यांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबीयांनी अहमदनगर भागात राहणारे साहिल, समीर आणि शकील यांच्यावर कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पीडित मुलीने सांगितले होते की, तिन्ही आरोपींनी तिला कारमध्ये नेले. जिथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलीच्या जबाबावरून आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा - Kota Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षांची शिक्षा)
दरम्यान, याप्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी गुन्ह्यात सहभागी असलेली कार जप्त करून आरोपी साहिलला अटक केली. तसेच त्याचे अन्य दोन साथीदार समीर आणि शकील यांचा शोध सुरू आहे. मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिन्ही आरोपींनी तिला आरडी गार्डी मेडिकल कॉलेज, आगर रोडच्या बाहेर सोडून पळ काढला.