किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Sep 28, 2020 12:18 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. आज सकाळी 11 वाजता या रेडिओ प्रोग्रॅमद्वारे पंतप्रधान जनतेशी संवाद साधतील. 'मन की बात' हा रेडिओ प्रोग्रॅम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर वर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लेटेस्ट घडामोडी, समस्या यासंदर्भात जनतेशी संवाद साधतात. कोरोना व्हायरस संकटासोबतच सध्याच्या घडीला देशात अनेक समस्या आहेत. त्यापैकी आज नेमकं मोदी कशावर बोलणार, याकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा शोध सुरु आहे. या प्रकरणाचा ड्रग्सच्या दिशेने सुरु असलेल्या तपासाअंतर्गत अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांचा काल एनसीबी चौकशी पार पडली. या चौकशीत या तिन्ही अभिनेत्रींनी दिलेल्या जबाबानंतर आता पुढील तपास नेमकं काय वळण घेणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
दरम्यान, काल शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटीमुळे राज्यात राजकीय भुकंप येणार का? जुने मित्र पुन्हा एकत्र येणार का? महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या भेटीमुळे हे भेट झाली का? अशा चर्चा समाजमाध्यमांमध्ये रंगल्या होत्या. मात्र थोडक्याच वेळात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी झाली असल्याचे सांगितले.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना व्हायरसचे संकट देशात कायम आहे. त्यावर लस किंवा औषध उपलब्ध होत नाही. तोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे अत्यंत जिकरीचे काम आहे. त्यामुळे लसीच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जगात अनेक लसी विकासाच्या विविध टप्प्यात पोहचल्या आहेत.