पुण्यात आज 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 3,628 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त, वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व हभप रामदास महाराज जाधव यांचे Covid19 मुळे निधन झालं आहे.

फार्म आणि लेबर बिल हे शेतकऱ्यांसह कामगारांना अनावश्यक कायद्यापासून मुक्त करतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.  

दिल्ली कॅपिटलस ने आयपीएल 2020 च्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला 44 धावांनी पराभूत केलं.


 

झारखंडमध्ये आज 1,261 नवीन कोरोना रुग्ण, तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार आहेत.

कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रेस्ट रुममध्ये 9 मिमीच्या तीन गोळ्या आणि AK-47 ची एक गोळी सापडली.

 

मुंबईमध्ये आज 1,876 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

देशभरात आज विविध ठिकाणी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलीसांनी आज 275 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या गांजाची रक्कम 15 लाख इतकी असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई शहरात गेल्या 24 तासात 1876 कोरोना रुग्णांची नोंद झाली. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 245 तासात 1169 रुग्ण बरे झाले. आहेत.

Load More

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नव्या कृषी विधेयकांविरोधात (New Farm Bills) विरोधकांनी आणि सत्ताधारी एनडीएतील काही घटकपक्षांनी विरोध दर्शवला. तरीही ही शेती विधेयकं संसदेत सरकारने मंजूर केली. मात्र हा बिलाला आता देशभरातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी विरोध दर्शवत आज भारत बंद ची (Bharat Bandh Against Farm Bills) हाक दिली आहे. या बिलाविरोधात आज शेतकरी संघटनांकडून देशव्यापी आंदोलन होणार आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध शेतकरी संघटनाही आज 'भारत बंद' मध्ये सहभागी होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, उत्तराखंड,कर्नाटक या राज्यांसह देशभरातील इतरही राज्यांतील शेतकरी या बंदमध्ये सहभागी होतील.

संपूर्ण देशाला 2020 हे वर्ष म्हणावे तितके चांगले नाही असच एकूण परिस्थितीवरुन दिसत आहे. एकीकडे मुसळधार पाऊसाने लोकांचे प्रचंड नुकसान झाले असून दुसरीकडे कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला ग्रासलेले आहे. देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 57 लाख 32 हजार 519 इतकी झाली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, कोरोना मृतांंचा टक्का हा 1.59% इतका आहे. तर आजवर कोरोनावर मात केलेल्यांंची संख्या (Coronavirus Recovered) 46, 74, 988 इतकी झाली आहे. कोरोना रिकव्हरी रेट सुद्धा सध्या 81 टक्क्यांंच्या वर आहे. देशात 9,66,382 जणांवर उपचार (Coronavirus Active Cases) सुरु आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तर महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 12,82,963 इतकी झाली आहे. तर मुंबईत कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,92,301 इतकी झाली आहे.