IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Sep 23, 2020 11:54 PM IST
मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे काल रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. तसंच भारतीय हवामान खात्याने मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशाराही दिला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय, त्रास टाळण्यासाठी आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच अनावश्यक कारणांनी घराबाहेर जाणे, टाळावे, असे आवाहनही बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे चर्चगेट-अंधेरी रेल्वेसेवा खंडीत करण्यात आली आहे. त्यामुळे विरार-अंधेरी विशेष गाड्या धावणार आहेत.
दरम्यान, देशातील कोरोना व्हायरसचे संकट कायम असून काल कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणित 1 लाखांहून अधिक रुग्णांची भर पडली. कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी टेस्टिंची संख्याही वाढवण्यात येत आहे. आता दिवसाला 12 लाखांहून अधिक कोविड टेस्ट करण्यात येत आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात 1224380 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 916348 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 274623 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, 33015 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.