Coronavirus Update (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update:  कोरोना व्हायरसचे 23 जून रोजीचे अपडेट भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आले आहेत, यानुसार मागील 24 तासात देशात एकुण 14933 नवे कोरोना रुग्ण वाढले असुन दुर्दैवाने 312 जणांचा मृत्यु झाला आहे. देशात आजवर एकुण 4 लाख 40 हजार 215 कोरोना बाधित आढळले असुन यापैकी सद्य घडीला 1 लाख 78 हजार 14 जण हे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 2 लाख 48 हजार 190 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना मृतांचा आकडा सध्या 14011 वर पोहचला आहे. कोविड-19 चा प्रभाव जगभरात असून कोरोना बाधितांची संख्या आणि त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा अमेरिकेत सर्वाधिक आहे. कोरोनाग्रस्त देशांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक चौथा आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. शेवटच्या ताज्या अपडेटनुसार राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 135796 वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत राज्यात 67706 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 6283 जणांचा या जीवघेण्या विषाणू विरुद्ध लढाईत जीव गेला आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठच तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. या व अन्य सर्व राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

ANI ट्विट

दरम्यान, मुंबईच्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ने फेवीपिरावीर (Favipiravir) अँटीव्हायरस टॅब्लेटला फॅबिफ्लू (FabiFlu) या ब्रँड नावाने बाजारात आणले आहे. कोरोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी याचा वापर करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून परवानगी मिळाली आहे. कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणे पाहता हा एक आशेचा किरण असु शकतो.