पुण्यात आज 212 नव्या कोरोना रुग्णांची नोंद ; 22 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Jun 22, 2020 11:57 PM IST
कोरोना व्हायरस आणि आर्थिक मंदी अशा संकटांना भारत तोंड देत आहे. कोरोनावर अद्यापही उपचार सापडला नाही. अवघे जगच उपचाराच्या प्रयत्नांत चाचपडते आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांनी कोरोना व्हायरस संकटाला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन लागू केला आहे. प्रत्येक देश आपापल्या पातळीवर लढतो आहे. दरम्यान, असे असताना भारत-चीन संबध कमालीचे ताणले गेले आहेत.
लद्दाख प्रदेशातील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी कुरापती केल्या. या वेळी झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. काही जखमी झाले. चीनच्या या आगळीकीनंतर भारत सरकारने लष्कराला मोकळीक दिली आहे. त्यामुळे सीमेवर चीनच्या कुरापतीला रोखण्यासाठी भारतीय लष्कराला आता पूर्ण स्वातंत्र्य आहे. चीनच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने (सरकारी) भारताच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
देश कोरोना आणि चीन अशा दोन्ही समस्यांशी लढतो आहे. त्यासोबत महाराष्ट्रही कोरोना व्हायरस संकटाविरोधात लढतो आहे. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढते आहे. असे असले तरी कोरोना व्हायरस रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला हाही एक मोठा दिलासा आहे.
कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, भारत चीन तणाव, नेपाळने सुरु केलेली कारणाशिवायची उठाठेव, राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांसह स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगशी जोडलेले राहा.