हरियाणा विधानसभेच्या मॉन्सून सत्राचा दुसरा भाग 5 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होणार आहे.

दुबईच्या आयपीएल सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटलसवर पाच गडी राखून पराभव केला.

 

राज्यभरातील शाळा 2 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. शाळा केवळ अर्ध्या दिवसासाठी कार्यरत असतील आणि विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणा नंतर घरी पाठवले जाईल. राज्य सरकारनेही विद्यार्थ्यांसाठी पर्यायी दिवसांवर वर्ग घेण्याचे ठरविले आहे, असं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

सहायक महासंचालक पंकज गोयल यांचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे.

मणिपूर पोलिसांसह आसाम रायफल्सने बिष्णुपूर जिल्ह्यातील चोथे गावात केसीपी (पीडब्ल्यूजी - खुमान) च्या दोन सक्रिय कार्यकर्त्यांना अटक केली, ज्यात एक 9 मिमी पिस्तूल (यूएसए -111), जिवंत दारूगोळा, दोन चिनी हँड ग्रेनेड आणि दोन डिटोनेटर्स जप्त केले आहेत. आसाम रायफल्सने याबाबत माहिती दिली.

तेलंगणा: हैदराबादमध्ये पावसामुळे सामान्य जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. पावसामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. इथले स्थानिक, उपेंद्र म्हणतात, 'मी येथे 30 वर्षांपासून राहत आहे पण मला एवढा पूर कधी दिसला नाही. हे सरकारच्या दुर्लक्षामुळे आहे. येथे ड्रेनेजचे काम व्यवस्थित नाही.'

कोरोना नियंत्रणासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून तो योग्य किंमतीत मिळण्यासाठी, पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे. आता एन 95 मास्क 19 ते 49 रुपये तर दुपदरी व तिनपदरी मास्क 3 ते 4 रुपयांना मिळणार. शासन निर्णय जाहीर-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

मुंबईत कोरोनाचे आणखी 1090 रुग्ण आढळले असून 1470 जणांची प्रकृती सुधारली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 8151 रुग्ण आढळल्याने आकडा 16,09,516 वर पोहचला आहे.

दिल्लीत कोरोनाचे आणखी 3579 रुग्ण आढळले असून 41 जणांचा बळी गेला आहे.

Load More

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. राज्यातील जनतेसाठी ही मोठी दिलासादाक बाब. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात सोमवारी (20 ऑक्टोबर) 5,984 रुग्णांची नोंद झाली. तर उपचार घेऊन बरे झालेले तब्बल 15 हजार रुग्ण घरी परतले. गेल्या चार महिन्यांमधील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता सोमवारची संख्या ही सर्वात निचांकी आहे. राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने हे चित्र सहाजिकच दिलासादायक आहे.

दुसऱ्या बाजूला मुंबईची वाहिनी अशी ओळख असलेल्या लोकल प्रवासाचा तिढा अद्यापही कायम आहे. सरकारने घोषणा केल्यानुसार किमान महिलांना तरी सरसकट रेल्वे प्रवासाची मुभा मिळेल अशी आशा होती. परंतू, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यात नियमावली ठरवण्यावरुन खेचाखेची सुरु आहे. त्यामुळे महिलांना लोकल प्रवास हा सध्यातरी काहीसा दुरापस्त दिसतो आहे.

राज्यातील दहावी-बारावी परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. दहावी-बारावी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा पार पडणार आहे. ही परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया राज्य मंडळाकरुन सुरु झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 20 ते 29 ऑक्टोबरदरम्यान नियमीत शुल्कासह अर्ज करावयाचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास विलंब होईल अशा विद्यार्थ्यांना 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यंत विलंब शुल्क भरुन अर्ज करता येणार आहे.

राज्यातील मुसळार पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. काही ठिकाणी अद्यापही पाऊस कोसळतोच आहे. मात्र, पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी राज्यातील शेतकरी सरकारकडे पाहतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, शरद पवार तसेच राज्यातील विरोधी पक्षनेते राज्यभर दौरे करत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. लवकरच योग्य ती मदत जाहीर केली जाईल, असे अश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.