Smugglers Shot Dead At Rajasthan Border: पाकिस्तानी चलन आणि ड्रग्ज घेउन घुसखोरी करताना 2 तस्करांंना भारतीय सैन्याकडुन कंंठस्नान- BSF
BSF | Representational Image | (Photo Credits: PTI)

राजस्थान (Rajsthan)  च्या सीमेवर श्रीगंंगानगर (Sriganganagar)  येथुन घुसखोरी (Intruding) करण्याचा काही तस्करांंचा डाव भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (BSF)  सैनिकांंनी उधळुन लावला आहे. घुसखोरी करत असताना बीएसएफ जवानांंनी गोळीबार करत दोन तस्करांंना (2 Smugglers Dead) जागीच कंंठस्नान घातले आहे. या तस्करांंकडुन पाकिस्तानी चलन (Pakistani Currency) व ड्रग्ज (Drugs) आणि तसेच हत्यारे सुद्धा जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात बीएसएफ कडुनच देण्यात आलेल्या माहितीनुसार, 8 व 9 सप्टेंंबर च्या दरम्यान तस्करी घुसखोरी होईल याविषयी सुत्रांंनी माहिती दिली होती त्यानुसार श्रीगंंगानगर भागात सैन्य जवानांंना तैनात ठेवण्यात आले होते, यानुसार काल मध्यरात्रीच्या सुमारास घुसखोरीचा प्रयत्न होताचा तस्करांंना जागीच ठार करण्यात आले.

माध्यमांंच्या माहितीनुसार, तस्करांंकडे सापडलेल्या हत्यारांंमध्ये 2 पिस्तुलांंचा समावेश आहे, याशिवाय 4 मॅंंगनीज, ड्रग्ज, नाईट व्हिजन आणि पाकिस्तानी चलन जप्त करण्यात आले आहे. Jammu Kashmir: जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तान चा झेंडा फडकवणार्‍या तिघांंना अटक, एक हॅण्ड ग्रेनेड सुद्धा जप्त

ANI ट्विट

दरम्यान, यापुर्वी 22 ऑगस्ट रोजी पंंजाबच्या बॉर्डरवर बीएसएफ जवानांंनी पाच घुसखोरांंना ठार केले होते. पंंजाबच्या तरणतारण भागात सैन्याला संशयास्पद हालचाली जाणवताच त्यांंनी तपास केला आणि या वेळी घुसखोरांंनी जवानांंवर गोळीबार केला ज्याला उत्तर देत बीएसएफ जवानांंनी तिथेच पाच घुसखोरांंना ठार केले होते.