Jammu Kashmir: जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तान चा झेंडा फडकवणार्‍या तिघांंना अटक, एक हॅण्ड ग्रेनेड सुद्धा जप्त
Jammu Kashmir Three People Arrested (Photo Credits: ANI)

जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu Kashmir Police)  आज मंगळवार, 8 सप्टेंंबर रोजी उत्तर काश्मीरच्या बंदीपोरा (Bandipora) येथील हाजिन जिल्ह्यात पाकिस्तानी झेंडे (Pakistan Flag) शिवणकाम व फडकवण्यासाठी तीन जणांना अटक केली असून या तिघांकडून कापड, शिवणकामाचे यंत्र आणि एक हॅण्ड ग्रेनेड जप्त केले आहे. हाजीन पोलिस स्थानकात विश्वसनीय स्त्रोतांकडून माहिती मिळाली होती ज्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांंकडुन देण्यात आली आहे. हे तीन ओव्हर ग्राऊंंड कामगार दहशतवादी मनोवृत्ती निर्माण व्हावी या भडकवण्याच्या उद्देशाने काम करत होते, त्यांंनी या मार्केट परिसरात पाकिस्तानचे झेंडे सुद्धा फडकावले होते असे बंदीपोरा पोलिसांंनी सांंगितले आहे. India-China Tensions: भारतीय लष्कराने LAC वर गोळीबार केल्याचा चीनचा दावा संरक्षण मंत्रालयाने फेटाळला

प्राप्त माहितीनुसार, मुजीब शामस, तनवीर अहमद मीर आणि इम्तियाज अहमद शेख अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही मीर मोहल्ला हाजिन येथील रहिवाशी आहेत. या तिघांंच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली असुन पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांंनी म्हंंटले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, एकीकडे LAC वर भारत चीन यांंच्यात तणावपुर्ण परिस्थिती असताना जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा जवान तैनात आहेत, या परिस्थितीत काश्मीर खोर्‍यांत स्थिरता राखण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले जात आहेत. यावर्षात आतापर्यंंत जवळपास 113 दहशतवादी त्यांंच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आले होते.