चीनकडून सोमवारी रात्री उशिरा लदाख मध्ये सीमारेषेवर (Line of Actual Control ) भारतीय लष्कराने फायरिंग केल्याचा तसेच सीमारेषा पार केल्याचा कांगावा करण्यात आला होता. त्यांनी तशी माहिती वृत्त पत्रकातूनही लिहली होती. मात्र आज (8 सप्टेंबर) भारतीय लष्कराने हा दावा खोडून काढला आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने अशाप्रकारे सीमा रेषेचे उल्लंघन किंवा कोणतीही फायरिंग झाली नसल्याचे सांगितले आहे. त्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामधून भारतीय लष्कराची बाजू मांडण्यात आलेली आहे. दरम्यान भारत-चीन मध्ये सोमवारच्या रात्रीच्या तणावग्रस्त स्थितीची माहिती देताना लदाखच्या उत्तर भागात PLA सैनिकांकडून काही फैर्या हवेत झाडल्याचा आणि भारतीय जवानांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
भारत आणि चीन मधील संबंध दिवसागणिक तणावग्रस्त बनत चालले आहेत. दरम्यान चीन सरकारच्या Global Times च्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य Line of Actual Control पार करून पुढे आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान Pangong Tso Lake च्या दक्षिण भागावर हा प्रकार झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच लदाख मधील या भागात एलएसीवर गोळ्यांच्या काही फैर्या झाडल्याची माहिती देण्यात आली आहे.
In the instant case on 07 September, it was China's PLA troops who were attempting to close-in with one of our forward positions along the LAC & when dissuaded by own troops, PLA troops fired a few rounds in the air in an attempt to intimidate own troops: Indian Army https://t.co/OtW4YgPKwJ
— ANI (@ANI) September 8, 2020
दरम्यान तणावगस्त स्थिती पाहता लषकर प्रमुख नरवणे देखील लदाखमध्ये काही दिवसांपूर्वी पोहचले आहेत. तेस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आज भारतीय लष्करानेदेखील चीन वारंवार कराराचं उल्लंघन करत आहे, चीनकडून गोळीबार झाला आहे अशी माहिती देत आहे.