कोवॅक्सिनची (Covaxin) तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 20 नोव्हेंबरपासून सुरू; 18 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Nov 18, 2020 11:43 PM IST
देशासह राज्यभरातील लॉकडाऊन अनलॉकच्या माध्यमातून शिथील करत आता अपवाद वगळता जवळपास संपुष्टात आणला गेला आहे. अशातच आणखी एक दिलासादायक वृत्त पुढे येत आहे. ते म्हणजे ज्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या भीतीमुळे लॉकडाऊन लावण्यात आला तिच कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या कमालीच्या वेगाने घसरणीला लागली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या काल पहिल्यांदाच 30 हजारांपेक्षाही कमी नोंदवली गेली. देशपातळीवरील आतापर्यंतची ही नोंद सर्वात निचांकी मानली जात आहे. अर्थात, अनलॉक आणि दिवाळ सणाचे निमित्त करुन नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. त्यामुळे त्याचा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास काही निमित्त ठरले का, हे कळायला आणखी काही दिवस जावे लागतील खरे. परंतू, सध्या तरी कोरोना रुग्णांची घटती संख्या दिलासादायक ठरत आहे.
अनलॉक करताना सर्व सेवा-सुविधा, दुकाने, कार्यालये सरु करण्यास परवानगी देण्यात आली. आता मंदिरे कधी उघडणार यासाठी आंदोनल करणाऱ्यांनाही सरकारने दिलासा देत मंदिरे उघडली. दरम्यान, आता शाळा कधी सुरु होणार याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, राज्य सरकारने इयत्ता नववी ते 12 पर्यंतचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी शाळेत येणाऱ्या शिक्षकांसाठी कोरोना व्हायरस चाचणी करणे बंधनकारक आहे. असे असले तरी शिक्षकांनी घाबरण्याचे मुळीच कारण नाही. कारण, शिक्षकांसाठी ही चाचणी पूर्णपणे मोफत केली जाणार आहे.
बिहार विधानसभा निवडणूक 2020 मध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी अगदीच सुमार दर्जाची झाली. त्यामुले काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते कपील सिब्बल यांनी नेतृत्वावर जाहीर तोफ डागली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कपिल सिबल यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस पक्षातील नेतेही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील नेत्यांकडून सिबल यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. आता हा वाद किती ताणला जातो याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, कोरोनाची रुग्णसंख्या घटली. ही दिलासादायक बाब नक्कीच आहे. परंतू, रुग्णसंख्या घटली म्हणून गाफील राहण्याचे काहीच कारण नाही. धोका अद्यापही टळला नाही. धोका कायम आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यायची आहे. मास्क वापरणे, सतत हात धुणे, कारणाशिवाय गर्दीत जाणे टाळणे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर जाणे टाळणे या बाब कटाक्षाणे पाळायच्या आहेत, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.