Live
विदेशातून भारतात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना कोरोना व्हायरस निगेटीव्ह चाचणी प्रमाणपत्र आवश्यक; 10 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Mar 10, 2020 11:42 PM IST
आज, 10 मार्च रोजी देशभरात धुलिवंदनाचा उत्साह साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणीही मोठमोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरी घरगुती, गल्ली- बोळातील धुळवड मात्र चांगलीच जोरदार सुरु झाली आहे. होळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक दिगंगाज मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दुसरीकडे राज्यात कोरोनाचे पहिले दोन रुग्ण आढळल्याने चिंतेचं वातावरण आहे. पुणे येथील एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अनेक व्यवसायाचे दिवाळं निघालं आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे साडे सहा लाख कोटी बुडाले आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, कालपासून मध्यप्रदेश मधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं दिसून येत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळातील नेते ज्योतिरादित्य सिंधीया यांनी बंडाचे निशाण फडकावल्याने काळ रात्रीचच कमलनाथ यांनी आपल्या 20 मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले. ज्योतिरादित्य हे भाजपच्या संपर्कात असून ज्योतिरादित्य यांच्या गटाच्या 17 आमदारांना तूर्तास बंगळुरू मध्ये भाजप ह्या नेत्यांकडून नेण्यात आल्याचे सांगण्यात येतेय. यामुळे मध्यप्रदेश मध्ये ऑपरेशन लोटस पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येतेय.