नवं वर्षाच्या अतिउत्साहामुळे 6 जणांनी जीव गमावला
फोटो सौजन्य- फाइल इमेज

नवं वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र पार्टी, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु नव वर्षाच्या अतिउत्साहामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

दिल्लीमध्ये थर्टी फर्स्ट आणि नवं वर्ष स्वागतासाठी डिजे लावण्यात आला  त्यावेळी 8 वर्षीय रोहन या मुलाला गोळी लागून मृत्यू झाला. तर अशाच प्रकारच्या आणखी एक घटनेत 14 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.तसेच पाटना येथे राजापुरात एक तरुण इमारतीच्या छतावरुन खाली कोसळून मृत्यू पावला.

या प्रकरणी इमारतीवरुन पडलेल्या मुलाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच राजस्थान येथे एका कार्यक्रमावरुन घरी जाणाऱ्या चार गाड्यांच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण या अपघातात जखमी झाले आहेत.