Dinesh Kumar Tripathi PC Twitter

New Navy Chief: भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी (Dinesh Kumar Tripathi) सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल 2024 रोजी  पुढील नौदल प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल आर, कुमार, 30 एप्रिल 2024 रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत.  त्यानंतर दिनेश कुमार हे नौदल प्रमुखाचे पदभार सांभाळतील. दिनेश कुमार त्रिपाठी यांनी  आयएनएस करची, आयएनएस विनाश, आयएनएस त्रिशुल या युध्दनौकांचे नेतृत्व केले आहे.  (हेही वाचा- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपमहासंचालक IPS संजय कुमार सिंग यांचा राजीनामा

सुमारे 40 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. VCNS म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम केले होते. त्यांनी विविध महत्त्वाच्या ऑपरेशनल आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्ताही केल्या आहेत. यापूर्वी दिनेश यांनी पश्चिम नौदल कमांडमध्ये फ्लॅग ऑफिसर कंमाडिंग इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता.

रिअर ॲडमिरल म्हणून, त्यांनी पूर्व फ्लीट कमांडिंग फ्लॅग ऑफिसर म्हणून काम केले. त्यांनी प्रतिष्ठित भारतीय नौदल अकादमी, एझिमालाचे कमांडंट आणि NHQs मध्ये कार्मिक प्रमुख म्हणूनही काम केले. व्हाइस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी DSSC वेलिंग्टन, नेव्हल वॉर कॉलेज, गोवा आणि नेव्हल वॉर कॉलेज यूएसए येथे अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.