IPS Sanjay Kumar Singh Resign: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपमहासंचालक, ओडिसा केडरचे आयपीएस संजय कुमार सिंग यांनी राजीनामा दिला आहे. नुकताचं सरकारने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग बस्ट प्रकरणात त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्लीन चिट दिली होती. संजय यांनी 'वैयक्तिक कारणे' सांगून सेवेतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा- बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल )
कॉर्डेलिया क्रुझ ड्रग बस्ट प्रकरणाच्या तपासात NCB DDG ज्ञानेश्वर सिंह यांच्यासमवेत संजय सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तत्कालीन NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या सर्व आरोपांमधून आर्यन खानला दोषमुक्त केले. संजय कुमार सिंह हो ओडिशा केडरचे 1996च्या बॅचचे आयपीएस अधिकाही आहेत. ते मुंबईत एनसीबीचे महासंचालक डीजी राहिले आहेत.
#Odisha cadre IPS officer Sanjay Singh, who led an NCB team & probed Aryan Khan drug case, takes voluntary retirement. pic.twitter.com/4amSnMm5Re
— Debabrata (@DebabrataTOI) April 18, 2024
संजय कुमार सिंग यांनी २९ फेब्रुवारीला VRS साठी अर्ज केला होता. ते जानेवारी 2025मध्ये निवृत्त होणार होते. राज्य सरकारने १६ एप्रिल रोजी VRS साठी अधिकाऱ्याला मान्यता दिली. 2008 ते 2015 दरम्यान संजय सिंग सीबीआयमध्ये कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी अनेक मोठंमोठे प्रकरण हाताळले होते. हरियाणा येथील माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला यांच्यावरील भ्रष्टाचाराचा खटला, तर २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समधील भ्रष्टाचार या प्रकरणात महत्त्वाची भुमिका पार पाडली होती.