New Income Tax E-Filing Portal आज होणार लॉन्च; करदात्यांनो! जाणून घ्या नव्या वेबसाईट बद्दल काही खास गोष्टी
The Income Tax | Representational Image | (Photo Credits: PTI)

आयकर विभागाचं नवं पोर्टल आज (7 जून) पासून सुरू होत आहेत. यामध्ये करदात्यांना पोर्टल वर ऑनलाईन तपशील देण्याची सुविधा अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. तसेच करदात्यांना आयटीआर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न देखील तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. आयकर विभगाच्या नव्या पोर्टलवर मोफत आयटीआर प्रिपरेशन सॉफ्टवेअर देखील मिळणार आहे. त्यामुळे सरकार आणि देशातील करदात्यांसाठी बहुप्रतिक्षित नव्या रूपातील हे पोर्टल करदात्यांच्या भेटीला आल्यानंतर नागरिकांच्या मनातील उत्सुकता देखील वाढली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (Central Board of Direct Taxes) मात्र यंदा 18 जूनला एक नवी टॅक्स पेमेंट सिस्टम जारी करणार आहे. यामागेही करदात्यांना कोणताही त्रास होऊ नये ही अपेक्षा आहे. कर परताव्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी यापूर्वी लागणार्‍या वेळेच्या तुलनेत आता नव्या प्रणालीमुळे वेळ कमी लागणार आहे. त्यामुळे आता ITR ची प्रक्रिया वेगवान होईल. Tax Compliance Timelines Extended: वाढत्या COVID च्या रुग्णसंख्येमुळे टॅक्स भरण्याचा कालावधीत वाढ, येथे जाणून घ्या अधिक.

आज लॉन्च होणार्‍या नव्या पोर्टल बद्दल घ्या जाणून

  • करदात्यांच्या मनातील प्रश्न, शंका,कुशंका दुर करण्यासाठी आता लाईव्ह चॅट एजंट्स, FAQs, चॅटबोट्स, मॅन्युअल्स असतील.
  • करदात्यांना आता एका क्लिकवर आणि डॅशबोर्डवर सारी इंटरेक्शन, अपलोड्स, पेडिंग अ‍ॅक्शन्स आणि फ़ॉलो अप्स पाहता येणार आहेत.
  • करदात्यांना तात्काळ इन्कम टॅक्स रिटर्न मिळावा म्हणून खास यंत्रणा आहे.
  • नव्या पोर्टल मध्ये आयटीआर 1,4 साठी ऑनलाईन, ऑफलाईन आयटीआर प्रिपरेशन सॉफ्टवेअर मिळणार आहे. आयटीआर 2 साठी ऑफलाईन असेल तर उर्वरित म्हणजे 3,5,6,7 साठी ही सेवा लवकरच सुरू केली जाणार आहे.
  • नव्या पोर्टल मध्ये इन्कम टॅक्स फॉर्म भरण्याची, अ‍ॅड टॅक्स प्रोफेशनल्स या सुविधा देखील मिळणार आहेत.

दरम्यान आयकर विभागाकडून लवकरच मोबाईल अ‍ॅप लॉन्च करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. पोर्टल प्रमाणेच अ‍ॅप वर देखील सुविधा मिळणार असल्याने आता करदात्यांना टॅक्स रिटर्नची गुंतागुंतीची प्रक्रिया सुकर होण्यास मदत होईल.