Income Tax Filing (Photo Credits: Pixabay)

Tax Compliance Timelines Extended: वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्राने शनिवारी मर्यादित कालावधीत वाढ केली आहे. हा निर्णय विशेष रुपात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे आणि करदाते, टॅक्स सल्लागार आणि देशाभरातील अन्य स्टेक होल्डर्स यांनी विरोध केल्यामुळे घेतला आहे. बहुतांश निवेदने मिळाल्यानतर विविध हितधारकांच्या समोर येणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने आयकर अधिनियम, 1961 च्या कमल 119 अंतर्गत दिलेली आहेत.

अर्थमंत्रालयाने शनिवारी एक ट्विट करत नव्या कालावधी संदर्भात घोषणा केली आहे. अर्थ मंत्रालयाने आपल्या आदेशात असे म्हटले आहे की, असेसमेंट ईअर 2020-21 साठी इनकम टॅक्स अॅक्ट 1961 च्या सेक्शन 139 साठी सब सेक्शन 4 आणि 5 अंतर्गत बिलेटेड रिटर्न आणि रिवाइज्ड रिटर्नची तारीख 31 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.(SBI कडून Home Loan च्या व्याज दरात कपात, KYC संदर्भात सुद्धा ग्राहकांना दिलासा)

Tweet:

Assessment Year 2020-21 संशोधित रिटर्न दाखल करण्याची तारीख यापूर्वी 31 मार्च 2021 होती. मात्र ती आता 31 मे 2021 करण्यात आली आहे. कोणताही व्यक्ती इनकम टॅक्स संबंधित कमिश्नर यांच्या समोर 31 मे पर्यंत अपील करु शकतात. यापूर्वीची तारीख 30 एप्रिल होती.

डिस्प्यूट रेजॉल्यूशन पॅनलच्या ऑब्जेक्शनची अंतिम तारीख 1 एप्रिल वाढवून 31 मे केली आहे.या सर्व सूटमुळे टॅक्सपेअर्सला मोठा दिलासा मिळणार आहे. जर 2 महिन्यात कोरोनाच्या परिस्थितीत सुधार नाही झाल्यास सरकार हा कालावधी आणखी वाढवू शकतो.