नवी दिल्ली येथील रेल्वे स्थानकावर थाबंबलेल्या एक्सप्रेसच्या बोगीला भीषण आग
रेल्वेस्थानकातील एक्सप्रेसला आग (Photo Credits-ANI)

नवी दिल्ली (New Delhi) येथील रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एक्सप्रेसच्या एका बोगीला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारच्या वेळेस घडली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर थांबलेल्या चंदीगढ- कोचुवेली एक्सप्रेसच्या बोगीला आग लागली असल्याचे वृत्त समोर येत आहे. आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या उपस्थित होत आगीवर नियंत्रण आणण्यात आले.

एक्सप्रेसच्या पावर कार बोगी मध्ये आग लागली. मात्र आता ट्रेन हजरत निजामुद्दीन स्थानकाच्या दिशेने पाठवण्यात आली आहे. या ठिकाणी बोगीच्या जळालेला भाग पुर्नास्थितीत करण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजल्याच्या सुमारास भीषण आग लागली होती.(अहमदाबाद येथे तीन मजली इमारत कोसळली)

या घटनेनंतर पियुष गोयल यांनी ट्वीट करत बोगीला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेत कोणतीच जीवीतहानी झाली नसल्याचे त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

चंदीगढ- कोचुवेली एक्सप्रेस नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीम रेल्वेस्थानकात थांबवण्यात येते. त्यानंतर पुढील मार्गासाठी ही एक्सप्रेस रवाना करण्यात येते.