Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील एथामध्ये सासरच्या मंडळींकडून सूनेला बेदम मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीडितेच्या पतीने ही संपुर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. सूनेला सासू आणि नंनद बेदम मारत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पीडित स्वत:ला वाचवण्यासाठी भरपूर विनंती करत आहे. पीडितीचे सासरे तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. (हेही वाचा- महिलांच्या वेशात येऊन अपार्टमेंटमध्ये दरोडा, 'चुडीदार गॅंग' CCTV कैद)
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील एता येथील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच, स्थानिक पोलिसांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवला नाही. पोलिस स्टेशनचे प्रभारी जैत्रा यांना व्हिडिओची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्हिडिओला एथा पोलिसांनी सांगितले की, यावर नियमानुसार कारवाई लवकरच केली जाईल.
एटा
कलयुगी सास ननद का अत्याचार जमकर कीबहू की धुनाई,
सास और ननद ने बहू को घसीट घसीट कर पीटा,वीडियो हुआ सोशल मीडिया पर वायरल
बहू ससुर से बचाने के लिए लगाती रही गुहार,पति बनाता रहा वीडियो,
पति के सामने पत्नी की कुटाई करती रही सास और ननद। @Uppolice pic.twitter.com/qUfAsKRUqD
— PRIME NEWS BHART UP (@presspradeep77) May 20, 2024
व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सूनेला कोणत्या कारणावरून मारहाण करत आहे हे अद्याप समोर आले नाही. धक्कादायक म्हणजे पीडित सूनेला पती समोर मारहाण करत आहे. पती हे सर्व कृत्य मोबाईलमध्ये कैद करत आहे. त्याने पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न सुध्दा केला नाही. पीडित महिलेला तीची नंनद केस आणि पाय ओढून मारहाण करत आहे.