Chudidar Gang in Hyderabad: महिलांच्या वेशात येऊन अपार्टमेंटमध्ये दरोडा, 'चुडीदार गॅंग' CCTV कैद
hydrabad Crime pc TWITTER

Chudidar Gang in Hyderabad:  तेलंगातील हैद्राबादमध्ये 'चुडीदार गॅंगची' नवी टोळी आली आहे. ही टोळी महिलांच्या वेशात घरात घुसून दरोडा टाकत असल्याचे निर्देशात आले आहे. बुरखा आणि चुडीदार सलवार आणि कुर्ता असा महिलांचा पोशाख परिधान करते आणि अपार्टमेंटच्या घरात घुसून चोरी करते. ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरीच्या गुन्ह्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.  (हेही वाचा- गाझियाबादमध्ये घरात घुसून गोळीबार, घटना CCTV कैद, गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबाद येथील एसआर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चेक कॉलनीतील आकृती आर्केड अपार्टमेंटमध्ये शनिवारी (१८ मे) रात्री दरोड्याची घटना घडली. अपार्टमेंटमधील एका घराला कुलुप होते. ते कुलूप तुटलेले दिसल्याने या घटनेची माहिती उघडकीस आली. अपार्टमेंटमधील मालक आपल्या कुटुंबीयांसह ओंगोल येथे गेले होते. चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या घटनेची माहिती घराच्या मालकाला देण्यात आली.

घराचे मालक के. व्यंकटेश्वर राव यांनी चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन जण महिलांच्या वेशात दिसल्या. ज्यांनी चुडीदार आणि तोंडाला मास्क घातले होते. हे दोघे जण घरात घुसल्याचे स्पष्टपणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. घरातून सोने, लाख रुपये आणि लॅपटॉपची चोरी केली आहे. चोरीच्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.