Image used for representational purpose

सासू आणि जावयाच्या अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या सासऱ्याचा हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बिहारच्या (Bihar) बांका (Banka) जिल्ह्यातील लौढिया (Laudhia) गावात घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी रजौन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. यासंदर्भात बांका एसडीपीओ दिनेश चंद्र श्रीवास्तव यांनी सासऱ्याच्या हत्येची पुष्टी केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

कलयुग पासवान असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कलयुग यांनी आपल्या मोठ्या मुलीचे लग्न राजेश पासवान याच्याशी लावून दिले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सासरीच राहत होता. या काळात त्याचे आपल्या सासूसोबत अनैतिक संबंध जुळले, असा आरोप राजेशवर आहे. एवढेच नव्हेतर, घरातील सदस्यांनाही याबाबत माहिती होती. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात कलियुगसुद्धा लुधियानाहून आपले काम संपवून स्वतःच्या घरी राहायला आला होता. घरी आल्यानंतर त्यांनी शेती करायला सुरूवात केली आणि पिकाची देखभाल करण्यासाठी त्याने शेतातचं झोपडी बांधून तिथेच राहायला सुरुवात केली होती. पण कलयुग घरात राहत असल्याने ते सासू जावयाच्या अनैतिक संबंधात बाधा ठरत होते. यामुळे कलयुगची हत्या करण्यात आली आहे, आरोप जावई राजेश पासवान यांच्यावर आहे. हे देखील वाचा- Meerut Murder: धक्कादायक! बहिणीने नकार दिला म्हणून भावाने गोळ्या घालून केले ठार; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश आणि त्याच्या सासूमध्ये अनैतिक संबंध होते, अशी चर्चा संपूर्ण गावभर होती. तसेच अनैतिक संबंध आणि हत्येची अन्य कारणे लक्षात घेऊन चौकशी आणि तपास केला जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे दिनेश चंद्र श्रीवास्तव म्हणाले आहेत. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत दिले आहे.