Raj Thackeray (Photo Credits: Twitter/ ANI)

देशामध्ये काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक 2019 पार पडली. मात्र या दरम्यान वापरण्यात आलेल्या ईव्हीएममध्ये दोष असल्याने राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयोगाला भेट देऊन निवेदन दिले होते. आता याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (TMC leader Mamata Banerjee ) यांची भेट घेणार आहेत. आज ते काही मनसे पदाधिकार्‍यांसोबत कोलकत्त्यामध्ये दाखल झाले आहेत. उद्या ते ममता बॅनर्जींची भेट घेणार आहेत.

देशभरात सध्या ईव्हीएम हटवून पुन्हा मतदानासाठी मतपत्रिकेचा वापर केला जावा यासाठी मागणी जोर धरत आहे. दिल्लीमध्ये राज ठाकरेंनी सोनिया गांधींचीदेखील भेट घेतली होती. येत्या 9 ऑगस्ट रोजी विविध पक्ष आणि संघटना ईव्हीएमविरोधात मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्यामध्ये राज ठाकरे देखील सहभागी होणार असून याच पार्श्वभूमीवर ते ममता बॅनर्जींची भेट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.

ANI Tweet

येत्या काही महिन्यात महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यानही राज ठाकरेंनी आघाडीमध्ये थेट सहभाग न घेता मोदी- शहा यांच्याविरोधात प्रचार करत युतीला मतदान न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.