Lok Sabha Elections 2019: दुसऱ्या टप्प्यातील मतदान 95 जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; 18 एप्रिल रोजी मतदान
Narendra Modi and Rahul Gandhi (PHoto Credits-PTI)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिलला होणार आहे. या टप्प्यात 11 राज्यातील 95 जागांसाठी निवडणुक लढवली जाणार असून तेथे मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान तमिळनाडु 38, कर्नाटक 14, महाराष्ट्र 10, उत्तर प्रदेश 8, आसाम, बिहार आणि ओडिशासाठी 5-5 तर पश्चिम बंगाल 3-3, जम्मू-काश्मिर 2आणि मणिपुर आणि पॉंडेचेरी येथील 1-1 अशा जागांसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काही केंद्रीय मंत्री यांनी देशभरात प्रचारसभा घेऊन आपल्या पक्षातील उमेदवारांना निवडणुन देण्यासाठी जनतेला आवाहन केले.

निवडणुक आयोगाने त्रिपूरा (पूर्व) लोकसभा क्षेत्रात वाईटपद्धतीने असलेल्या कायद्यांच्या व्यवस्थेमुळे 18 एप्रिल रोजी होणारे मतदान घेण्यात येऊ नये असे मागणी मंगळवारी केली आहे. तसेच हे मतदान आता 23 एप्रिलला होणार आहे. वेल्लोर लोकसभा मतदारसंघासाठी पार पडणारे मतदान रद्द करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी द्रमुकचे उमेदवार यांच्या कार्यालयातून कथित रुपात बक्कळ पैसा जप्त करण्यात आला होता. राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी निवडणुक आयोगाकडून कारवाई केली होता. सिफारशीच्या आधारावर जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्यात आली.(हेही वाचा-Loksabha Election 2019: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर सह हे ७ कलाकार आजमवणार नशीब)

या नेत्यांचे भाग्य EVM मध्ये बंद होणार

केंद्रीय मंत्री जु्एल ओरांव, सदानंद गौडा आणि पी राधाकृष्णन, माजी पंतप्रधान एच डी देवगौडा, काँग्रेस नेते एम वीरप्पा मोइली (राज बब्बर), नॅशनल कॉन्फ्रेंस अध्यक्ष फारुक अब्दुल्ला, भाजप नेते हेमा मालिनी आणि द्रमुकचे दयानिधी मारन, ए राजा, भाजपचे एसपी बघेल, अमरोहा येथून बसपा उमेदवार दानिश अली आमि कनिमोई सहभागी आहेत.

दरम्यान या निवडणुकीसाठी जवळजवळ 90 करोड मतदार मतदान करणार आहेत. यंदा लोकसभेच्या 543 जागांसाठी निवडणुक लढवण्यात येणार आहे. तर 11 एप्रिल,18,23,29 एप्रिल आणि 6,12,19 मे रोजी मतदान पार पडणार असून निकाल 23 मे रोजी लागणार आहे.