Bihar Assembly Elections 2020 Exit Polls Live Streaming on Aaj Tak: येथे पाहा आजतकच्या एक्झिट पोलचे निकाल
Bihar Assembly Elections 2020 | (Photo Credits: File Image)

बिहारमध्ये (Bihar Assembly Election 2020) अखेरच्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज 16 जिल्ह्यांमधील 78 जागांसाठी मतदान झाले असून एकूण 1204 उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात येणार आहे. दरम्यान, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा एनडीएची सरकार स्थापन होणार की तेजस्वी यादव महागठबंधनला सत्ता मिळवून देणार? आजतकचा एक्झिट पोलच्या (Aaj tak) माध्यमातून अशा अनेक प्रश्नांना पूर्णविराम मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने निवडणूक आयोगाकडून ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच इतर नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तसेच कोरोना संकटामुळे नक्षलग्रस्त ठिकाणे वगळता इतर ठिकाणी मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली होती. बिहारमध्ये जवळपास 7.29 कोटी मतदार आहेत. दरम्यान, नितीश कुमार सलग चौथ्यांदा आपल्याला मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचे आवाहन करत असून ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत आहेत. हे देखील वाचा-Bihar Assembly Elections 2020 Exit Polls Live Streaming on Republic Bharat: इथे पाहा रिपब्लिक भारत चे एक्झिट पोल्स अंदाज

आजतक एक्झिट पोल-

कोरोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक ठरली आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. या निवडणूकीत कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा जागा आहेत. 243 जागांसाठी 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. त्या वेळी राजद-जदयू या पक्षांच्या महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या. आता विधानसभा निवडणूक 2020 मध्ये जनता काय कौल देते याबाबत उत्सुकता आहे.