Bihar Assembly Elections 2020 Exit Polls Live Streaming on Republic Bharat: इथे पाहा रिपब्लिक भारत चे एक्झिट पोल्स अंदाज
Bihar Assembly Elections 2020 Exit Polls

बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) जाहीर झाल्यापासून उडालेला धुरळा अखेर आज खाली बसतो आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. या निवडणुकीची मतमोजणी येत्या 10 नोव्हेंबरला पार पडत आहे. दरम्यान, आज सायंकळाली मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज (Bihar Assembly Election 2020 Exit Polls Results ) आज जाहीर होत आहेत. विविध वाहिन्यांनी हे अंदाज व्यक्त केले आहेत. त्यापैकी एक असलेल्या रिपब्लिक टीव्ही एक्झिट पोल निकाल लाईव्ह स्ट्रमिंग आपण येथे पाहू शकता.

रिपब्लिक टीव्ही एक्झिट पोल अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सायंकाळी संपले की विविध वृत्तवाहिण्या आपला एक्झीट पोल जाहीर करत आहेत.

कोणत्याही वाहिनी अथवा संस्थेने जाहीर केलेला एक्झिट पोल अंदाज हा अंतीम निकाल कधीच नसतो. परंतू, जनतेची भावाना काय आहे. याबबतची उत्सुकता आणि एक दिशा स्पष्ट होण्यास मदत होते इतकेच. अर्थात अनेक वेळा एक्झीट पोल्सचे सर्व अंदाज चुकून भलताच निकालही लागला आहे. त्यामुळे एक्झिट पोल्स हे सर्वस्वी अंतिम आणि सत्य मानले जात नाहीत.

बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा जागा आहेत. 243 जागांसाठी 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. त्या वेळी राजद-जदयू या पक्षांच्या महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या. आता विधानसभा निवडणूक 2020 मध्ये जनता काय कौल देते याबाबत उत्सुकता आहे.