LIC Recruitment 2019: एलआयसी मध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रीया आणि इतर माहिती
Representational Image (Photo credits: Pixabay)

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तर मग तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. एलआयसी (LIC) हाउसिंग फायनान्समध्ये असिस्टंट (Assistant Manager) आणि असोसिएट मॅनेजर (Associate Manager) या पदांसाठी भरती सुरु आहे. यासाठी 300 जागा असून नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला 20 ऑगस्ट पर्यंतची मूदत देण्यात आली आहे. मेरिटच्या आधारावर नोकरीसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल. (Indian Navy Recruitment 2019: 10 वी पास तरुणांसाठी भारतीय नौसेनेत नोकरीची संधी! पहा कसा, कुठे कराल अर्ज?)

मात्र या पदांसाठी उमेदवारी अर्ज भरताना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा काय असावी?, निवड प्रक्रीया काय असेल? आणि इतर आवश्यक बाबी जाणून घेऊया...

शैक्षणिक पात्रता:

# असिस्टंट आणि असोसिएट मॅनेजर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कमीत कमी 55% गुण असणे आवश्यक आहे.

# असोसिएट पदासाठी पदवी परीक्षेत 60% गुण हवेत.

# असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार MBA असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 28 वर्षे इतके असावे.

निवड प्रक्रिया:

लेखी परीक्षा आणि मुलाखत याद्वारे एलआयसी एचएफएलच्या मॅनेजर पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी तुम्ही www.lichousing.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. यावर तुम्हाला इतर महत्त्वाची आणि आवश्यक माहिती मिळेल. (MUHS Recruitment 2019: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीच्या विविध संधी; जाणून घ्या पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर माहिती)

तर नोकरीची गरज असलेल्यांनी आणि नोकरीसाठी इच्छुक अशा उमेदवारांनी LIC मधील नोकरीची ही संधी अजिबात दवडू नका.