MUHS Recruitment 2019: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीच्या विविध संधी; जाणून घ्या पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर माहिती
Representational Image (Photo Credits: File Photo)

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध पदांसाठी जागा रिक्त असून त्यासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. तुम्हीही जर नोकरीच्या शोधात असाल आणि खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेत, वयोमर्यादेत बसत असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करु शकता. नोकरीसाठी आवश्यक माहिती म्हणजेच पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, महत्त्वाच्या लिंक खाली दिल्या आहेत. त्यावरुन तुम्हाला अर्ज कुठे, कसा भरायचा याचीही माहिती मिळेल. (MIDC Recruitment 2019: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदाच्या 865 जागा रिक्त; पहा कसा कुठे कराल अर्ज?)

विविध पदे आणि त्यांची माहिती:

# उच्चश्रेणी लघुलेखक- 2 पदे

शैक्षणिक अर्हता : शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, इंग्रजी लघुलेखन आणि टंकलेखन 120/50शब्द प्रति मिनिटं, मराठी लघुलेखन आणि टंकलेखन 120/40 शब्द प्रति मिनिटं आणि अनुभव

# सहायक लेखापाल- 2 पदे

शैक्षणिक अर्हता : वाणिज्य शाखेतील पदवीधर आणि अनुभव

# निम्नश्रेणी लघुलेखक- 2 पदे

शैक्षणिक अर्हता : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, इंग्रजी लघुलेखन आणि टंकलेखन 100/40 शब्द प्रति मिनिटं, मराठी लघुलेखन आणि टंकलेखन 100/30 शब्द प्रति मिनिटं आणि अनुभव

# सांख्यिकी सहायक - 2 पदे

शैक्षणिक अर्हता : सांख्यिकी किंवा बायोमेट्रीक्स किंवा इकॉनॉमेट्रीक्स किंवा मॅथेमॅटिकल इकॉनॉमेट्रीक्स ह्या शाखांमध्ये कमीत कमी 45 % गुणांनी पदव्युत्तर.

किंवा

ब. गणित, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखांमध्ये कमीतकमी 45 % गुणांनी पदव्युत्तर आणि अभ्यासक्रमात सांख्यिकी किंवा मॅथेमॅटिकल इकॉनॉमेट्रीक्स या विषयावर आधारित 100 गुणांच्या परीक्षेचा समावेश आवश्यक.

किंवा

क. गणित, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखांमध्ये कमीतकमी 45% गुणांनी पदव्युत्तर आणि सांख्यिकी विषयातील पदव्यूत्तर पदविका.

किंवा

ड. गणित, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखांमध्ये कमीतकमी 45% गुणांनी पदव्युत्तर आणि डेमोग्राफी अथवा पॉप्युलेशन सायन्स ह्या विषयांत प्रमाणपत्र अभ्यासक्रम.

किंवा

इ . मास्टर्स ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन आणि गणित, अर्थशास्त्र, सांख्यिकी किंवा वाणिज्य ह्या शाखांमधील कमीत कमी 45% गुणांनी पदव्युत्तर.

# वरिष्ठ सहायक- 6 पदे

शैक्षणिक अर्हता : पदवीधर आणि अनुभव

# विद्युत पर्यवेक्षक- 1 पद

अ. विद्युत अभियांत्रिकी विषयाची पदवी अथवा पदविका आणि विद्युत पर्यवेक्षकाचा आणि अनुभव

किंवा

ब. २ वर्षाचा इलेक्ट्रिशियन/ वायरमेन ट्रेड उत्तीर्ण आणि नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड चे प्रमाणपत्र आणि विद्युत पर्यवेक्षकाचे शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र.

किंवा

क. 2 वर्षांचा आय. टी. आय ( इलेक्ट्रिशियन/ वायरमेन) कोर्स उत्तीर्ण आणि 1 वर्षाचा विद्युत प्रशिक्षणाचा शासनातर्फे दिला गेलेला परवाना.

# छायाचित्रकार- 1 पद

शैक्षणिक अर्हता : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. छायाचित्रण किंवा कमर्शियल आर्टस् किंवा फाईन आर्टस् ह्या विषयांमध्ये पदविका अथवा छायाचित्रणाचा किंवा सिनेमॅटोग्राफीचा कोर्स आणि अनुभव.

# वरिष्ठ लिपिक/ डीईओ - 8 पदे

शैक्षणिक अर्हता : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. टंकलेखन वेग इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिटं आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिटं.

# लघु टंकलेखक- 12 पदे

शैक्षणिक अर्हता : नामांकन करून नियुक्तीला पात्र होण्यासाठी उमेदवार अ . उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. लघुलेखन वेग कमीत कमी 80 शब्द प्रति मिनिटं. टंकलेखनअपेक्षित वेग इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिटं आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिटं. शासकीय नोकरीत कार्यरीत नसल्यास वय १८ वर्षाहून अधिक.

# असिस्टंट कम ऑडियो/व्हिडियो एक्स्पर्ट- 1 पद

शैक्षणिक अर्हता : अप्लायीड आर्टस् किंवा फाईन आर्टस् ह्या विषयांमध्ये पदविका अथवा छायाचित्रणाचा किंवा सिनेमॅटोग्राफीचा कोर्स आणि कामाचा अनुभव आणि अनिवार्य.

# लिपिक कम टंकलेखक/ डीईओ/ रोखपाल/ भंडारपाल- 39 पदे

शैक्षणिक अर्हता : अ. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, टंकलेखनाचा अपेक्षित वेग इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिटं आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिटं.

# वीजतंत्री- 2 पदे

शैक्षणिक अर्हता : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. आय. टी. आय ( इलेक्ट्रिशियन/ वायरमेन) कोर्स प्रमाणपत्र आणि शासनातर्फे मिळणार अधिकृत वीजतंत्री परवाना असणे आवश्यक आणि अनुभव अनिवार्य.

# वाहन चालक- 1 पद

शैक्षणिक अर्हता : वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना. 4 थीची परीक्षा उत्तीर्ण, मराठी, इंग्रजी हिंदी ह्या भाषांमध्ये संभाषण करण्याची क्षमता. वाहन चालवण्याचा कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव आणि वाहन खराब झाल्यास नीट करण्याची क्षमता. भौगोलिक ज्ञान असणे आवश्यक.

# शिपाई- 8 पदे

शैक्षणिक अर्हता : 4 थी उत्तीर्ण.

# वयोमर्यादा: जास्तीत जास्त ३८ वर्षे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट 5 वर्षे शिथील करण्यात आली आहे.

# अधिक माहिती साठी : http://bit.ly/2xVX27b या वेबसाईटला भेट द्या.

# अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/2O3wls1 येथे क्लिक करा.

परीक्षा देण्यासाठी लागणारी महत्त्वाची माहिती, अर्ज भरण्याची अंतिम तारीख यांसारखी महत्त्वाची माहिती तुम्हाला वरील लिंकवर उपलब्ध होईल. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी हा प्रयत्न नक्की करुन पहा.