MIDC Jobs 2019: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदाच्या एकूण 865 जागा रिक्त असून त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पदे आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याची माहिती राज्याच्या माहिती MIDC च्या ऑफिशिअल साईटवर आणि जनसंपर्क महासंचालनालयच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन देण्यात आली आहे.
पदे आणि शैक्षणिक पात्रता:
# कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 35 पदे
शैक्षणिक अर्हता : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
# कनिष्ठ अभियंता (विद्युत आणि यांत्रिकी) 09 पदे
शैक्षणिक अर्हता : इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
# लघुलेखक (निम्न श्रेणी) 20 पदे
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी लघुटंकलेखन 80 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुटंकलेखन 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
# वरिष्ठ लेखापाल 04 पदे
शैक्षणिक अर्हता : बी. कॉम
# सहाय्यक 31 पदे
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी.
# लिपिक टंकलेखक 211 पदे
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि एमएच-सीआयटी
# भूमापक 29 पदे
शैक्षणिक अर्हता : आयटीआय (भूमापक), ऑटो कॅड
# वाहनचालक 29 पदे
शैक्षणिक अर्हता : 7 वी उत्तीर्ण, हलके व अवजड वाहन चालक परवाना आणि 02 वर्षे अनुभव
# तांत्रिक सहाय्यक 34 पदे
शैक्षणिक अर्हता : आयटीआय (आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) किंवा आयटीआय (स्थापत्य/अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक)
# जोडारी 41 पदे
शैक्षणिक अर्हता : 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (वेल्डर)
# पंपचालक 79 पदे
शैक्षणिक अर्हता : 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (वायरमन)
# विजतंत्री 09 पदे
शैक्षणिक अर्हता : 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिशिअन)
# शिपाई 56 पदे
शैक्षणिक अर्हता : किमान 4 थी उत्तीर्ण
# मदतनीस 278 पदे
शैक्षणिक अर्हता : किमान 4 थी उत्तीर्ण
वयोमर्यादा:
07 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. तर मागासवर्गीय उमदेवारांना वयोमर्यादेत 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
आवेदनाची अंतिम तारीख:
07 ऑगस्ट 2019
# अधिक माहितीसाठी https://bit.ly/2XNFDwV येथे क्लिक करा.
# ऑनलाईन अर्जासाठी करण्यासाठी https://www.midcindia.org/recruitment या लिंकवर क्लिक करा.
तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही सुवर्णसंधी अजिबात दवडू नका.