भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या दिवशी खास शुभेच्छा!
Lata Mangeshkar, Narendra Modi | Photo Credits: Twitter

आज देशभरामध्ये रक्षाबंधन (Raksha Bandhan)  म्हणजे राखी पौर्णिमेचा (Rakhi Pournima) सण साजरा केला जात आहे. या दिवसाचं औचित्य साधत भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सोशल मीडियातून शुभेच्छा देत खास संदेश पाठवला आहे. यामध्ये त्यांनी 'कोविड 19 संकटामुळे त्यांच्यासह अनेक भगिनी नरेंद्र मोदींना राखी बांधू शकत नसल्याचं म्हणाल्या आहेत, मात्र या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही आम्हांला आश्वस्त करा की तुम्ही देशाला अशाप्रकारे पुढे घेऊ जाल.' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील लता मंगेशकर यांच्या ट्वीटला उत्तर दिले आहे .

लता मंगेशकर यांचं ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्वीट

रक्षाबंधनाच्या दिवशी लता मंगेशकर यांनी दिलेला भावपूर्ण संदेश प्रेरणा, ऊर्जा देणारा आहे. देशातील कोट्यावधी माता-बहिणींच्या आशिर्वादामुळे आपला देश नवी उंची गाठेल, यश मिळवेल. अशी आशा व्यक्त केली आहे. सोबतच लता मंगेशकर यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना अशा आशयाचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

श्रावणी पौर्णिमेचा दिवस महाराष्ट्रामध्ये नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन म्हणून साजरा करतात. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याला ओवाळते. त्याच्याबदल्यात ती भावाकडून रक्षण करण्याचं वचन घेते.