CAA अणि NRC बाबत अमित शाह यांना विरोध करण्यासाठी 1 लाख कार्यकर्ते उभारणार 35 किमी मानवी भिंत; काळ्या कपड्यात करणार BJP चा निषेध
अमित शहा (फोटो सौजन्य-ट्वीटर)

देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी (CAA and NRC) या गोष्टींचा निषेध अजूनही चालू आहे. केरळसह (Kerala)भरात अनेक ठिकाणी आंदोलने चालू आहेत. 15 जानेवारी रोजी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) केरळ दौर्‍यावर आहेत. या वेळी त्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागू शकतो. केरळमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ 15 जानेवारी रोजी अमित शाह कोझीकोड येथे येत आहेत.

या दरम्यान अमित शाह यांच्या निषेधार्थ केरळचा पक्ष इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या (IUML), 1 लाख कार्यकर्त्यांनी 'काळी भिंत' (Black wall) उभारण्याची योजना आखली आहे. अमित शहा यांचा काफिला ज्या मार्गाने जाईल तिथे कार्यकर्ते काळ्या कपड्यांमध्ये त्यांचा विरोध करतील.

कालिकत विमानतळ ते वेस्टिल हेलीपॅड दरम्यान 35 किलोमीटरची ही मानवी साखळी बनवली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, 15 जानेवारी रोजी होणाऱ्या या रॅलीसाठी अमित शाह कालिकत विमानतळावर उतरतील. येथून ते हेलिकॉप्टरने रॅलीच्या ठिकाणी सुमारे 35 कि.मी.चा प्रवास करतील. या कालावधीत, आययूएमएलचे कार्यकर्ते संपूर्ण 35 किलोमीटरपर्यंत मानवी साखळी बनवतील. सर्व कामगार काळ्या कपड्यात दिसतील. आयआयएमएल हा युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) चा एक घटक असून कॉंग्रेसच्या नेतृत्वात युतीत आहे. (हेही वाचा: CAA: राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी लोकांची दिशाभूल केली आणि दंगली घडवल्या; अमित शहा यांचा आरोप )

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. यापैकी आययूएमएल हा पहिला राजकीय पक्ष असून त्याने सीएएविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात होत असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर भाजपने या कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते सर्वत्र मोर्चे आणि जाहीर सभा घेत आहेत आणि लोकांना समजावून सांगत आहेत की या कायद्याचा भारतीय मुस्लिमांवर कोणताही परिणाम होत नाही.