CAA: राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी लोकांची दिशाभूल केली आणि दंगली घडवल्या; अमित शहा यांचा आरोप
BJP National President Amit Shah | (Photo Credits-ANI)

Amit Shah Blames Rahul Gandhi and Priyanka Gandhi: सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत (Citizen Amendment Act) जनतेची दिशाभूल करणे आणि दंगल भडकावणे असे आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर केले आहेत. सीएएमुळे (Citizen Amendment Act) देशातील कोणताही नागरिक आपले नागरिकत्व गमावणार नाही, असे आश्वासन शहा यांनी अल्पसंख्याक समाजातील सदस्यांना दिले. हा कायदा तीन शेजारच्या देशांतील छळ केलेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याविषयी आहे आणि कोणाचे नागरिकत्व काढण्यासंदर्भातील नाही.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल करीत भाजप अध्यक्ष अमित शाह म्हणाले की, "पाच वर्षांपूर्वी आपण अनेक आश्वासनांद्वारे लोकांना दिशाभूल करून सत्तेवर आलात. कुणीही एकदाच लोकांची दिशाभूल करू शकतं परंतु कायमस्वरूपी नाही."

दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल भाजपाकडून जनजागृती करण्याचे अभियान राबवले जात आहे. आज दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये एका मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मेळाव्याला संबोधित करत असताना गृहमंत्री शाह यांनी हा आरोप केला आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिल्लीत भाजपाची सत्ता येईल,"असेही शाह म्हणाले.

Citizenship Amendment Act: केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांचे नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासह 11 मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, दिल्लीसह उत्तर प्रदेशात व देशाच्या विविध भागात निदर्शने सुरू आहेत. उत्तर प्रदेशमधील निदर्शने, दंगली आणि जाळपोळ झाली. काही ठिकाणी पोलिसांच्या धडक कारवाईत 20 पेक्षा जास्त मृत्यू आणि अनेक जखमी झाले. गेल्या महिन्यात निषेध झाल्यापासून शेकडो लोकांना अटक करण्यात आली.