Sharon Raj Murder: केरळच्या एका न्यायालयाने एका 24 वर्षीय महिलेला तिच्या प्रियकराची हत्या केल्याबद्दल मृत्युदंडाची शिक्षा सुनावली (Woman Poisons Boyfriend) आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने शेरोन राज हत्याकांडातील आरोपी ग्रिष्मा हिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी न्यायालयाने 26 वर्षीय ग्रिष्माला दोषी ठरवले होते. तसेच ग्रिष्माचा काका निर्मल कुमार यांनाही पुरावे नष्ट करणे आणि कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. निर्मल कुमार यांनाही तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 2022 मध्ये या तरुणाची हत्या करण्यात आली होती. मृत शेरोन राज, वय 23, मूळचा तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील परसाला येथील रहिवासी होता. (RG Kar Rape Case Verdict: आरजी कर डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीला आज सुनावणार शिक्षा)
पुरावे नष्ट केल्याबद्दल काकाही दोषी
ग्रिष्माची आई सिंधू या प्रकरणात सह-आरोपी आहेत. परंतु पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ग्रिष्माला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली दोषी ठरवण्यात आले. यामध्ये खून (भारतीय दंड संहितेच्या कलम 302) देखील समाविष्ट होता. तर तिच्या काकाला आयपीसीच्या कलम 201 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.
शेरोन राजची हत्या कशी झाली?
14 ऑक्टोबर 200 रोजी मुख्य आरोपी ग्रीष्माने काही कारणाने तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील रामवरमंचिराई येथील तिच्या घरी शेरोन राजला बोलावले होते. कीटकनाशक आयुर्वेदिक टॉनिकमध्ये मिसळून त्याला ते प्यायला दिले. त्यानंतर 11 दिवसांनी 25 ऑक्टोबर 2022 रोजी राजचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचे अनेक अवयव काम करणे थांबले होते. यापूर्वीही तिने फळांच्या रसात पॅरासिटामोलच्या गोळ्या मिसळून राजला खायला देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कडू चवीमुळे त्याने ते पिण्यास नकार दिल्याने तिचा तो प्लान अयशस्वी झाला होता.
हत्येचे कारण काय?
22 वर्षांच्या ग्रीष्माचे नगरकोइल येथील एका जवानाशी लग्न ठरले होते. मात्र, राजने त्यांचे नाते संपवण्यास नकार दिल्याने ग्रिष्माने त्याच्या हत्येचा कट रचला.