Kathua Encounter: जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील जंगल परिसरात रविवारी दहशतवादी आणि पोलिस यांच्यात चकमक झाली. तर दुसरीकडे पुंछ जिल्ह्यात रात्रभर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाल्याचे समजते. कठुआ जिल्ह्यातील बानी भागातील दुर्गम नुकनाली येथे दुपारचया सुमारास पोलिसांच्या शोध पथकावर दहशतवाद्यांकडून गोळीबार झाला. पोलिस दलाने गोळीबाराला प्रत्युत्तर दिले, (हेही वाचा:Kishtwar Encounter: किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद, 2 जण जखमी )
त्यावर दोन्ही बाजूंमध्ये गोळीबार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिका-यांनी सांगितले की, दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्यासाठी आणि परिसर आधिक मजबुत करण्यासाठी हा गोळीबार करणयात आला. दोन ते तीन दहशतवादी असल्याच्या गुप्त माहितीवरून शनिवारी संध्याकाळी पोलीस आणि लष्कराने या भागात संयुक्त शोध मोहीम सुरू केली. (हेही वाचा:Udhampur Encounter: उधमपूरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार )
लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडून शोध पथकाला गोळीबार झाला. त्यामुळे चकमक सुरू झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.