JNU Violence: जेएनयूमधील तोडफोड-हाणामारीवर NCP चे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया
जेएनयूमध्ये हिंसाचारानंतर पोलिस बंदोबस्त तैनात (Photo Credits: IANS)

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (Jawaharlal Nehru University) मुखवटा घातलेल्या लोकांनी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना मारहाण केली. रविवारी रात्री जेएनयूच्या (JNU) कॅम्पसमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली. काही मुखवटा घातलेल्यांनी विध्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला आणि कॅम्पसमधील मालमत्तेचे नुकसान केले ज्याच्यानंतर प्रशासनाला पोलिसांना बोलवावे लागले. या हल्ल्यात जेएनयूएसयूची अध्यक्ष आयुशी घोष (Aishe Ghosh) आणि अन्य अनेक विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. जेएनयूएसयू विद्यार्थी संघटनेने दावा केला आहे की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) वस्तीगृहामधील विद्यार्थ्यांवर हल्ला घडवला आहे. जेएनयू टीचर्स असोसिएशनने वाढलेल्या शुल्कवाढी संदर्भात बोलावलेल्या बैठकीत हा सगळा राडा झाला. जेएनयूमधील हिंसाचाराचा विरोधी पक्षांनी निषेध केला असून प्रशासनाला शांतता प्रस्थापित करण्यास सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी या हल्ल्याला नियोजित असल्याचा दावा केला, तर महाराष्ट्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या हल्ल्याचा निषेध केला. (JNU मध्ये हिंसाचार: मॉबने कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केला, JNUSU चे अध्यक्ष आइशी घोष गंभीर जखमी; स्टुडंट युनियनने एबीव्हीपीला ठरवले दोषी)

शरद पवारांनी ट्विट करून या प्रकरणावर भावना व्यक्त केली आणि म्हणाले, "जेएनयूचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर भ्याड, परंतु नियोजित हल्ल्याची कारवाई करण्यात आली. तोडफोड आणि हिंसाचाराच्या या लोकशाहीवादी कृत्याचा मी तीव्रपणे निषेध करतो. लोकशाही मूल्ये आणि विचार दाबण्यासाठी हिंसक माध्यमांचा वापर कधीही यशस्वी होणार नाही." जयंत पाटीलांनीही ट्विट केले आणि अज्ञातांना शिक्षेची मागणी केली, "जेएनयू ही संवादाची भूमी, ज्ञानाची भूमी आहे! विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर झालेल्या क्रूर हल्ल्याचा मी निषेध करतो. अशा भयानक गोष्टी देशात कधी घडल्या नव्हत्या. त्या गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे!" दुसरीकडे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली. आदित्यने लिहिले, "निषेध व्यक्त करताना विद्यार्थ्यांविरुद्ध होणारा हिंसाचार आणि क्रौर्य चिंताजनक आहे. ते जामिया असो, वा जेएनयू. विद्यार्थ्यांना अश्या क्रूर शक्तीचा सामना करु नये! त्यांना राहू द्या! या गुंडांना कारवाईला सामोरे जावेच लागेल. त्यांना वेळेवर समोर आणले पाहिजे आणि त्वरित न्याय द्यावा लागेल."

शरद पवार

जयंत पाटील

आदित्य ठाकरे

हिंसाचाराची घटना उघडकीस आल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि अन्य विरोधी नेत्यांनी केंद्रावर निशाणा साधला, तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर किमान 18 जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष इशी घोष यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि दगडफेकीत इतर अनेक विद्यार्थीही जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.