Jammu and Kashmir Accident: अमरनाथ यात्रेकरूना घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा अपघात, दोन जण जखमी
Accident PC PIXABAY

Jammu and Kashmir Accident: अमरनाथ (Amarnath) यात्रेकरूना घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील चंदनवारीजवळ घडली आहे. यात किमान दोन यात्रेकरू जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी बचावर कार्य सुरु झाले. जवानांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा- कोस्टल रोड भुयारी मार्गात भरधाव BMW चा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भिंतीवर आदळली (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या जलद प्रतिसादामुळे प्रवाशांचा जीव वाचला आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. अपघातानंतर या घटनेची माहिती सोशल मीडियावर देण्यात आली आहे. अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये महिला आणि पुरुष जखमी अवस्थेत दिसत आहे. अपघातानंतर यात्रेकरूमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील यात्रेकरू राजेश गुप्ता यांनी सांगितले की, केंद्रीय राखीब पोलिस दल आणि शिबिरांनी पुरवलेल्या सर्व सुविधा आणि सुरक्षतेमुळे खुप चांगले वाटत आहे. लष्करातील प्रत्येकाने सहकार्य केले आहे त्यामुळे आमचा प्रवास योग्य रितीने होत आहे. असं दुसऱ्या यात्रेकरूने सांगितले आहे. तर काहींनी नुकताच्य घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे चिंता व्यक्त केली आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षतेसाठी आणि आरोग्यची काळजी घेण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडत नाही.