Coastal Road Accident: कोस्टल रोड भुयारी मार्गात बीएमडब्ल्यूचा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. नव्याने सुरु झालेला कोस्टल रोड आधी गळतीमुळे तर आता अपघातामुळे चर्चेत आला आहे. कोस्टल रोड भुयारी मार्गात एक बीएमड्ब्लूय कार भरधाव वेगाने जात होती. गाडीचा स्पीड वाढला असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. आणि कास समोर असलेल्या भिंतीला जाऊन धडकली. सुदैवाने या घटनेत कुठलीच जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे. रविवारचा दिवस असल्यामुळे कोस्टल रोडवर गाड्यांची वर्दळ नसते. याच गोष्टीचा फायदा घेत बीएमडब्ल्यू कार चालक भरधाव वेगाने गाडी चालवत होता.

व्हिडीओ पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)