A representational picture of Hindu wedding. (Photo credits: Pixabay)

Jabalpur Shocker: मध्य प्रदेशातून बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली असून, जबलपूरमध्ये एका 37 वर्षीय महिलेवर मुस्लिम व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या तक्रारीत महिलेने दावा केला आहे की, विवाहित साईट शादी डॉट कॉमवर त्या व्यक्तीने स्वतःला हिंदू म्हंटले होते. शनिवारी, 30 नोव्हेंबर रोजी महिलेने पोलिसात जाऊन त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली तेव्हा ही घटना उघडकीस आली. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला जबलपूरच्या कोतवाली भागातील रहिवासी आहे. Shaadi.com वर स्वत:ला "राहुल" अशी ओळख देणाऱ्या एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मोहम्मद हुसेन असे आरोपीचे नाव आहे.

अधिका-यांनी सांगितले की, हुसैनने "राहुल" नावाने बनावट प्रोफाइल तयार केले आणि पीडितेशी संपर्क साधून तिच्याशी लग्न करण्याचा आपला इरादा व्यक्त केला. 22 सप्टेंबर रोजी आरोपीने लग्नाचे बोलण्याच्या बहाण्याने महिलेला भगवानगंज परिसरातील दर्पण हॉटेलमध्ये बोलावले, परंतु त्याने तिच्यावर बलात्कार केला.

महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि तिला धमकावले. फसवणूक झाल्याच्या भावनेने महिलेने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हुसैनला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध बलात्कार, शोषण आणि एससी/एसटी कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनीही या घटनेचा तपास सुरू केला आहे. ते आणखी पुरावे गोळा करण्याचा आणि आरोपींशी संबंधित आणखी पीडितांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.