What is Y Level Security?  केंद्र सरकारने कंगना रनौत ला दिलेली Y+ सुरक्षा म्हणजे काय जाणुन घ्या
Kangana Ranaut gets Y+ Security (Photo Credits: File Image)

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने काही दिवसांपूर्वी मुंबई (Mumbai)  शहराची पाकव्याप्त काश्मीर (POK) सोबत तुलना करत अनेकांंचा रोष ओढावुन घेतला आहे. या विधानावरुनच शिवसेनेच्या (Shivsena) महिला आघाडीकडून तिच्या पोस्टर्सना चप्पलांंनी मारण्यापासुन ते अगदी थोबाड फोडण्यापर्यंत सगळ्या धमक्या देउन झाल्या आहेत. यावरुनच चिंंता व्यक्त करत कंगनाच्या वडिलांंनी केंद्र सरकारकडे आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी तरतुद करण्याची विनंंती केली होती. या विनंंतीला मान देत आज केंद्र सरकारकडुन कंगनासाठी Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येण्याची माहिती देण्यात आली आहे. आता ही सुरक्षा म्हणजे काय आणि त्यात नेमक्या काय सुविधा मिळणार याविषयी अनेकांंना कुतुहुल आहे, याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.. Kangana Ranaut on Sanjay Raut: संजय राऊत मी तुमची निंदा करते, तुम्ही महाराष्ट्र नाही आहात; कंगना रनौत हिचे सडेतोड उत्तर

कंगनाला देण्यात आलेली 'Y+' सुरक्षा ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था आहे. या Y दर्जाच्या सिक्युरिटी मध्ये एकूण 11 कर्मचारी असतात. ज्यात 1 किंवा 2 कमांडो आणि बाकी पोलीस कर्मचारी संबधित व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडतात. यामध्ये 2 PSO (Personal Security Officer) सुद्धा असतात. ही सुविधा पुरवण्यासाठी कंंगना ने  गृहमंत्री अमित शाह यांंचे ट्विट करुन आभार मानले आहेत. 

कंगना रनौत ट्विट

दरम्यान, कंंगना ने सुद्धा आपल्याला धमकावणार्‍यांंना आपण 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहोत तुम्हाला काय करायचंं ते करा अशा शब्दात आव्हान दिले आहे. यावेळी म्हणजेच 9 सप्टेंंबरला कंंगनाला 'Y' दर्जाची सुरक्षा पुरवली जाईल अशी सुत्रांची माहिती आहे